अमळनेरच्या शेतकऱ्याची ५ लाखांत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 04:03 PM2019-07-19T16:03:34+5:302019-07-19T16:04:07+5:30
फसवणुकीचा गुन्हा दाखल
अमळनेर : हरितगृह बांधण्याच्या नावाखाली ठेकेदाराने येथील एका शेतकºयाला ५ लाखांना फसविले आहे.अशोक वना बाविस्कर (रा.आशीर्वादनगर) यांची तालुक्यातील पिळोदा शिवारात गट ५९९ मध्ये शेती आहे. त्यांना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत हरित गृह २३ जानेवारी रोजी मंजूर झाले होत. ६ ते १९ मार्चदरम्यान ते उभारणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांनी समृद्ध ग्रीन हाउस एजन्सीला करार करून ११ हजार रुपये बयाना रक्कम दिली. त्यानंतर वेळोवेळी एकूण ५ लाख ११ हजार रुपये एजन्सीच्या खात्यावर भरले. ठेकेदाराने सुरुवातीला दिखाऊ फाउंडेशन केले. मात्र ग्रीन हाउस बांधले नाही. बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सचिन उत्तम मोरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.