आम आदमी पक्षावर संशोधन, अमळनेरच्या पोलिसाने मिळविली पीएच.डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:54 PM2020-02-11T12:54:30+5:302020-02-11T12:55:47+5:30

राजकीय विषयावर डॉक्टरेट

Amalner's Ph.D. | आम आदमी पक्षावर संशोधन, अमळनेरच्या पोलिसाने मिळविली पीएच.डी

आम आदमी पक्षावर संशोधन, अमळनेरच्या पोलिसाने मिळविली पीएच.डी

Next

अमळनेर : येथील पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेचे अंमलदार शरद तुकाराम पाटील यांनी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. ही पदवी मिळविणारे ते पोलीस दलातील तिसरे तर राजकीय विषयावर डॉक्टरेट मिळविणारे एकमेव पोलीस आहेत. ‘भारतीय राजकारणातील नवे प्रवाह, विशेष संदर्भ : आम आदमी पक्ष’ या विषयावर त्यांनी संशोधन केले.
शरद हे चौथीत असतानाच त्यांचे वडील वारले. संसाराचा सर्व भार आईवर येऊन पडला. त्यामुळे शरद व त्यांचे मोठे बंधू शिक्षणासोबतच पार्टटाईम जॉबही करू लागले होते. दहावीत त्यांना ७२ टक्के मिळाले. त्यानंतर त्यांनी आय. टी. आय. (फिटर) केले. त्यातही ७१ टक्के गुण मिळाले. त्याबरोबरच वायरमनचा कोर्स व सीएनसी (कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल)चा कोर्स केला. एक वर्ष केबीएक्स कंपनीत काम केले. २०१६मध्ये ते उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले.
त्यानंतर पीएच. डी. करण्याची इच्छा झाली. त्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा (पेट) ही उत्तीर्ण झाले. नोकरी व संसार सांभाळून डॉक्टरेट होणे सोपे नव्हते. मात्र प्रताप महाविद्यालयातील पीएच. डी.चे गाईड प्रा. डॉ.विजय तुंटे यांनी शरद यांचा आत्मविश्वास वाढविला. यशाचे श्रेय पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना देतात.
अपयश हीच पहिली पायरी अन् दुसरी पायरी यशाची
उपनिरीक्षक पदाची परिक्षा देताना पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यशाने हुलकावणी दिली. ते काहीसे उदास झाले, मात्र खचले नाहीत. २०१६मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्याच्या अभ्यासात ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले. काही तांत्रिक अडचणींमुळे शरद यांच्या डोक्यावर उपनिरीक्षकाची कॅप व खांद्यावर स्टार लागणे बाकी आहे.

Web Title: Amalner's Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव