यूपीएससीत अमळनेरच्या वृष्टी जैन हिचे घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:10+5:302021-09-27T04:17:10+5:30
अमळनेर ओसवाल जैन संघाचे ज्येष्ठ सदस्य नेमिचंद चोपडा यांची वृष्टी ही नात असून, व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झालेले संदीप ...
अमळनेर ओसवाल जैन संघाचे ज्येष्ठ सदस्य नेमिचंद चोपडा यांची वृष्टी ही नात असून, व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झालेले संदीप व आरती चोपडा यांची ती एकुलती सुकन्या आहे. तिचा भाऊ बेंगलोर येथे साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. नाशिकला दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वृष्टीने मुंबई विद्यापीठातून अर्थशास्राची पदवी संपादन केली. एवढ्यावरच न थांबता उच्च पदस्थ अधिकारी होण्याच्या महत्त्वाकांक्षेने वृष्टी हिने दिल्ली गाठली. तेथे जैन महिला वसतिगृहात राहून जिद्द, प्रचंड आत्मविश्वास, खडतर प्रयत्नांमुळे पहिल्याच प्रयत्नात तिला मुख्य परीक्षा व त्यानंतरच्या मुलाखतीत घवघवीत यश मिळाले.
हे वृत्त समजताच महेंद्रलाल कोठारी, विनोद कोठारी, चेतन कांकरिया, अरुणकुमार पारख, चंदना चोपडा, प्रा. अरुण कोचर, प्रफुल्ल संघवी, सुनील छाजेड, दीपचंद छाजेड, जी. टी. टाक, कळमसरे ग्रामस्थ व जैन ओसवाल संघाने वृष्टी हिचे अभिनंदन केले आहे.
260921\26jal_3_26092021_12.jpg
वृष्टी जैन