अंबानी अन् मुख्यमंत्रिपदामुळे माझ्या वाट्याला वनवास- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:37 AM2019-03-07T04:37:36+5:302019-03-07T04:37:45+5:30

उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले.

Ambassador and Ambassador to Mecca - Eknath Khadse | अंबानी अन् मुख्यमंत्रिपदामुळे माझ्या वाट्याला वनवास- एकनाथ खडसे

अंबानी अन् मुख्यमंत्रिपदामुळे माझ्या वाट्याला वनवास- एकनाथ खडसे

Next

सावदा (जि.जळगाव) : उद्योगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने आपली अशी अवस्था झाल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सावदा येथे केले.
अल्पसंख्याक समाजातर्फेखडसे यांचा नागरी सत्कार झाला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखविली. खडसे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी नाआवडता झालो. एका मोठ्या व्यक्तीने मुस्लीम समाजाच्या जमिनीवर बांधलेले घर जमीनदोस्त करून ती जमीन सरकार जमा करण्याचा आदेश आपण दिला होता. मात्र ती व्यक्ती दुसरे कुणी नव्हे तर अंबानी निघाले. त्यांनी अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. वास्तविक, ती जमीन अल्पसंख्याक समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती. अशा अनेक मोठ्या जमिनी सरकार जमा करण्याचा निर्णय आपण घेतला होता. मात्र काहींना तो निर्णय रुचला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्यावर आज ही वेळ आली आहे, असा आरोप खडसे यांनी केला.

Web Title: Ambassador and Ambassador to Mecca - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.