अंबरझरा पाटचारी कचरा आणि गाळाने भरली तुडूंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:14+5:302021-05-28T04:13:14+5:30
फोटो नंबर २८ सीटीआर २७ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या ...
फोटो नंबर २८ सीटीआर २७
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मेहरुण तलावाचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या अंबरझरा तलावाच्या पाटचारीत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि गाळ साचल्याने ही पाटचारी तुडूंब भरली आहे. त्यामुळे तलावाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार आहे. मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी या पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी व नागरिकांकडून केली जात आहे.
जळगाव शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाचा अंबरझरा येथील मुख्य जलस्त्रोत आहे. मेहरूण तलावाचा हा एकच मुख्य जलस्त्रोत आहे. हा तलाव भरल्यानंतर पाटचारीद्वारे हे पाणी अंबरझरा तलावात येते. गेल्या वर्षी या पाटचारीची मराठी प्रतिष्ठान मार्फत सफाई संपूर्ण गाळ काढण्यात आला होता. तसेच पाटचारी खोलही करण्यात आली होती. मात्र, या पाटचारीला लागून नागरी वस्ती असल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा या पाटचारीत जमा होतो. गेल्या वर्षी या पाटचारीची सफाई केल्यानंतर, आता पुन्हा या ठिकाणी कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी मराठी प्रतिष्ठानच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली आहे, अशी माहिती विजय वाणी यांनी दिली.
इन्फो :
तर तलाव अपूर्ण भरणार
मेहरुण तलावात अंबरझरा तलावाच्या पाटचारीद्वारेच पाणी येते. सध्या हा एकच तलावाचा मुख्य जलस्त्रोत आहे. जर पाटचारीची पावसाळ्या पूर्वी स्वच्छता केली नाही, तर तलावाकडे येणारा पाण्याचा स्रोत मंदावेल. त्यामुळे तलाव पूर्ण भरणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने तातडीने ही पाटचारीची स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.