चालकाला भोवळ अन् लिपिकाने चालविली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:55+5:302021-04-18T04:15:55+5:30

जळगाव : बाधित महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला जात असताना अचानक रुग्णवाहिका चालकाला भोवळ आली, मात्र, रात्रीची वेळ असल्याने शासकीय ...

Ambulance driven by unwary clerk | चालकाला भोवळ अन् लिपिकाने चालविली रुग्णवाहिका

चालकाला भोवळ अन् लिपिकाने चालविली रुग्णवाहिका

Next

जळगाव : बाधित महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराला जात असताना अचानक रुग्णवाहिका चालकाला भोवळ आली, मात्र, रात्रीची वेळ असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यू समन्वय समितीचे (डेथ कॉर्डिनेशन समिती) सदस्य तथा वरिष्ठ लिपीक विलास वंजारी यांनी स्वतः शववाहिका चालवली. त्यामुळे मृतदेहावर वेळेवर नेरी नाका येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होऊ शकले. याबद्दल नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाबाधित मृतदेह नेरी नाका येथे स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाईकांना मदत म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक शववाहिका मिळाली आहे. त्यावर चालक म्हणून चंद्रकांत पाटील (रा.खोटेनगर) हे शुक्रवारी १६ रोजी कार्यरत होते. त्याचवेळी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घेउन जाण्यास नातेवाईकांनी सांगितले. मात्र, त्यावेळी शववाहिका चालक चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत बिघडल्याने ते चक्कर येवून पडले. याबाबत माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यू समन्वय समितीचे सदस्य विलास वंजारी यांनी चालकास प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच रात्री नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःशववाहिका चालवत नेत नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेह आणला.

Web Title: Ambulance driven by unwary clerk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.