अमळनेरात अन्न व औषध विभागाकडून दुध डेअरींची तपासणी
By admin | Published: April 25, 2017 01:54 PM2017-04-25T13:54:46+5:302017-04-25T13:54:46+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका:यांनी अमळनेर येथील दोन दूध संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेतले आहे.
अमळनेर, दि.25- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका:यांनी अमळनेर येथील दोन दूध संकलन केंद्रातील दुधाचे नमुने तपासणी साठी ताब्यात घेतले आहे. एका केंद्रातील दुधाची तपासणी करण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी आर.आर.चौधरी यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता येथील कुंटे रोड वरील वर्णेश्वर दूध डेअरी , जुने बस स्टॅन्ड जवळील गुरुदत्त डेअरी येथील दुधाचे नमुणे तपासणी साठी ताब्यात घेतले. तसेच आनंद दूध डेअरीतील दुधाची तपासणी करण्यात आली. याबाबत चौधरी यांनी सांगितले की, ही नियमित तपासणी असून घेतलेले नमुने मुंबई किंवा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. तपासणी अहवालात नमुने भेसळयुक्त आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल .