अमळनेरात केंद्र व राज्य शासन विरोधात कॉँग्रेसचे निदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 01:29 PM2017-06-06T13:29:17+5:302017-06-06T13:29:17+5:30

तहसीलदारांना दिले निवेदन

Amendment of the Congress against the Center and the State Government | अमळनेरात केंद्र व राज्य शासन विरोधात कॉँग्रेसचे निदर्शन

अमळनेरात केंद्र व राज्य शासन विरोधात कॉँग्रेसचे निदर्शन

Next

 ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.6 : केंद्र   व राज्य शासनाविरोधात कॉँग्रेसने आज घोषणा देत तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
 सकाळी 9 वाजता  शासकीय विश्राम गृहाच्या आवारात कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.  संदीप पाटील यांनी काँग्रेसची बैठक घेतली.तेथून मोर्चा काढून बळीराजा चौकात येत 10 मिनिटे केंद्र व राज्य शासनाच्या विरोधी घोषणा दिल्या.  त्यामुळे रस्त्यावर वाहतूक खोळंबली. मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ आल्यावर घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. निवेदनात तीन वर्षे झाली अच्छे दिन आलेच नाहीत म्हणून काँग्रेस तर्फे सरकारचा निषेध करीत आहोत असे म्हटले आहे . यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील  , युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील,  महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, रामभाऊ संदनशिव, माधुरी पाटील, धनगर पाटील, मुन्ना शर्मा , प्रा श्याम पवार, बी. के. सूर्यवंशी, राजाक शेख , फायजखा पठण उपस्थित होते.
 

Web Title: Amendment of the Congress against the Center and the State Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.