खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा ९ रोजी जळगाव जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:34 PM2019-08-06T12:34:32+5:302019-08-06T12:35:22+5:30

राष्ट्रवादीतर्फे युवक, वकील, डॉक्टरांशी संवाद

Amol Kolhe's visit to Shivswarajya in Jalgaon district | खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा ९ रोजी जळगाव जिल्ह्यात

खासदार अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा ९ रोजी जळगाव जिल्ह्यात

Next

जळगाव : विविध मतदारसंघातील डॉक्टर, वकील, युवक, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ़ अमोल कोल्हे हे शिवस्वराज्य यात्रा काढणार असून ही यात्रा ९ आॅगस्ट रोजी, पारोळा, धरणगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे येणार आहे़ याबाबत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली़ दरम्यान, शहरासंदर्भात पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे़
राज्यभरातील सुरूवातीला ५५ मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे़ डॉ़ अमोल कोल्हे हे ९ आॅगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पारोळा, सायंकळी पाच वाजता धरणगाव, सायंकाळी सात वाजता पाचोरा व त्यानंतर चाळीसगाव येथे मुक्काम असा त्यांचा दौरा असेल़
या यात्रेत संवादासह, सभा आयोजित करण्यात आल्या आहेत़ या सभेत युती सरकारच्या काळातील गैरकारभाराची पत्र वाटप करण्यात येणार आहे़ प्रत्येक सभेत खासदार डॉ़ कोल्हे हे शिवराज्य सनदचे वाचन करणार आहेत़ यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने शिवराज्य जननी जिजाऊ माता या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील युवतींसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे़
प्रथम विजेत्या युवतीला शिवराज्य यात्रेच्या समारोपास आमंत्रित करून शिवराज्य जननी जिजाऊ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे़ यावेळी माजी युवकाध्यक्ष ललित बागूल, संदीप पाटील, सलीम इनामदार, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, नीला चौधरी, कल्पिता पाटील, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते़
यावेळी माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांची शहर अर्बन सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शहराध्यक्ष नामदेव चौधरी यांनी अर्बन सेलवर अश्विनी देशमुख यांच्यासह राजू मोरे, लता मोरे, दुर्गेश पाटील, वास़ एस़ महाजन, किरण राजपूत, अनिरूद्ध जाधव, भारत कार्डिले, किरण वाघ, उज्ज्वल पाटील, यांची निवड केली आहे़
भाजप वर्षपुर्तीच्या महिला आघाडी घेणार प्रतिक्रिया
भाजपाला जळगाव शहरात वर्षपूर्ती झाल्यामुळे त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झालीत की नाही, याबाबत घरोघरी जावून प्रतिक्रिया घेण्याची मोहीम राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Amol Kolhe's visit to Shivswarajya in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव