पारोळा येथील अमोलचे यूपीएससी परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 08:40 PM2019-08-03T20:40:47+5:302019-08-03T20:40:53+5:30
पारोळा : येथील अमोल मधुकर पाटील यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीएपीएफमध्ये असिस्टंट कमांडेंटपदी निवड झाली आहे. याबद्दल जिल्ह्यातून अमोल ...
पारोळा : येथील अमोल मधुकर पाटील यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सीएपीएफमध्ये असिस्टंट कमांडेंटपदी निवड झाली आहे. याबद्दल जिल्ह्यातून अमोल यांचे कौतुक होत आहे.
अमोल यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षेला प्राधान्य देत देशातून ३९ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. यशाबद्दल बालाजी प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष यू.एच.करोडपती, मुख्याध्यापक हेमंत पाटील, विश्वास वाघ, प्रमोद निकम, प्रा.आर.ए.पाटील, सुभाष पाटील, पी.के. पाटील, समाधान निकम, गजानन पाटील, डॉ.पुरुषोत्तम पाटील, संगीता पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच हे यश मिळवून शहराचे नाव उज्वल केल्याबद्दल माजी आमदार चिमणराव पाटील, मा.नगराध्यक्षा नलिनी पाटील यांनी ही कौतुक केले. अमोल सेवानिवृत केंद्रप्रमुख मधुकर पाटील व माध्यमिक शिक्षिका ज्योती देशमुख यांचे चिरंजीव आहेत.