भुसावळात रिकामटेकड्यांना प्रशासनाकडून ‘अँटीजन’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:33 AM2021-04-17T00:33:09+5:302021-04-17T00:38:10+5:30

अत्यावश्यक सेवा वगळता इतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असतानाही गावात तसेच बाजारपेठेत रिकामटेकडे फिरणाऱ्यांची काही कमी होत नसल्याचे चित्र आहे.

The amount of 'antigen' given by the administration to the vacancies in Bhusawal | भुसावळात रिकामटेकड्यांना प्रशासनाकडून ‘अँटीजन’ची मात्रा

भुसावळात रिकामटेकड्यांना प्रशासनाकडून ‘अँटीजन’ची मात्रा

Next

भुसावळ : दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत  संचारबंदी (लॉकडाऊन) लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. असे असतानाही गावात तसेच बाजारपेठेत रिकामटेकडे फिरणाऱ्यांची काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. लोक विनंती करून, सांगूनही एकत नाही यामुळे आता प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्यासोबतच रस्त्यावर रिकामटेकडे भटकणाऱ्यांची थेट रस्त्यावरच अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. 
या अँटीजन चाचणीत जे कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना थेट कोविड सेंटरला दाखल करण्याची धडक मोहीम पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाने सुरू केली      आहे. 
संपूर्ण भुसावळ विभागातील भुसावळ शहरासह रावेर, यावल, मुक्ताईनगर व बोदवड येथे ही कारवाई सुरू केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे, तर अँटीजन चाचणी हा काहींच्या चेष्टेचा विषयही झाला आहे.
भुसावळात ११३ केसेस केल्या
भुसावळ शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध व्यावसायिकांवर शुक्रवारी ११३ केसेस करण्यात आल्या. तसेच ४८ दुचाकीधारकांना दंड आकारण्यात आली. 
याशिवाय रिकामे फिरणाऱ्या ७५ जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात एका पाॉझिटिव्ह निघाला, तर तीन गेल्या दिवसात ५५० जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यात ६ जण पाॉझिटिव्ह आढळले.

Web Title: The amount of 'antigen' given by the administration to the vacancies in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.