धनादेशाची रक्कम खात्यावर जमा होईना
By admin | Published: January 19, 2017 12:11 AM2017-01-19T00:11:06+5:302017-01-19T00:11:06+5:30
धरणगाव : कापूस उत्पादनात वाढ, मात्र पैसे मिळण्यास हाल, नोटाबंदीचा परिणाम
धरणगाव : सध्या शेतकºयांची अवस्था ‘देवाने दिले, अन् सरकारने हाल केले’ अशी झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने कापसासह इतर पिकांचे उत्पादन भरघोस आले. मात्र सरकारने ‘नोटाबंदी’चा निर्णय घेतल्याने व्यापारी व जिनिंग उद्योजक शेतकºयांना धनादेशाने पैसे अदा करीत आहेत. मात्र बँकेत धनादेश जमा केल्यानंतर शेतकºयांच्या खात्यावर १५-१५ दिवस पैसे जमा होत नसल्याने शेतकरी शासन व बँकांवर संताप व्यक्त करीत आहे.
यंदा निसर्गाने साथ दिल्याने शेतकºयांना कापूस उत्पादन भरघोस झाले. सरकारने हमी भाव कमी दिले असले तरी जिनिंग उद्योजक, खासगी व्यापारी पाच हजार पाचशेवर प्रती क्विंटलच्या भावात सध्या कापूस खरेदी करीत आहेत. मात्र देवाने भरघोस उत्पन्न दिले असले तरी कापूस विक्रीची रक्कम रोख भेटत नसल्याने शेतकरी नाराजीचा सूर काढत आहेत. हा रोख पैसे मिळाल्याचा आनंद हिरावणाºया सरकारवर शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
माल द्या, अन् धनादेश घ्या
कापूस, मका उत्पादक शेतकरी माल विक्री करून व्यापाºयांकडून धनादेश घेत आहेत. रोखीने कोणीही माल खरेदी करीत नसल्याने धनादेश घ्यावे लागत आहेत. हा धनादेश जिल्हा बँकेत, अर्बन बँकेत वा युनियन बँकेत जमा केला गेला तर शेतकºयांच्या खात्यावर १५ दिवसानंतरच रक्कम जमा होत आहे. शेतकºयांच्या खात्यावर धनादेशाची रक्कम उशिरा का जमा होत आहे, हे कुणीही सांगायला तयार नाही. आॅनलाइनच्या या जगात हेतूपुरस्सर बँकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
येथील मोठा माळीवाडा भागातील रहिवासी विनोद गोकूळ माळी यांच्या फोनवर बँक अधिकारी (बनावट) असल्याची माहिती घेऊन सर्व खात्याची चौकशी केली. सरकारी व बँक खात्याच्या कामासाठी त्यांच्या एटीएम कार्डाचे डिजिट नंबर व कोड नंबर विचारून तुमचे अकाऊंट व्हेरिफाय करीत असल्याचे सांगून खात्यातून चार वेळा करून एकूण २८ हजार ९९७ रुपये रक्कम आॅनलाइन काढली.
खात्याची माहिती देऊ नये -पाटील
यापूर्वी चार-पाच शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेत अशी लूट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याचा तपास लागलेला नाही. असे बोगस फोन करणाºयांना खात्याची माहिती कुणीही देऊ नये, असे आवाहन धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)
मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्टÑीयकृत बँकांमधून कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यामुळे शेतकºयांनाही आता एटीएम कार्डाचा वापर करावा लागत आहे.
४मात्र या प्रक्रियेत बँक अधिकाºयांच्या नावाचा वापर करून अशिक्षित शेतकºयांचा एटीएम कार्डाचा डिजिट नंबर व कोड नंबर विचारून त्यांच्या खात्यातून आॅनलाइन रक्कम काढण्याचे प्रकार घडले आहेत.