शेतकरी कजर्माफीत जळगाव राज्यात अव्वल, दीड लाख शेतक-यांच्या खात्यावर रक्कम जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:32 PM2017-12-12T12:32:54+5:302017-12-12T12:35:00+5:30
474 कोटी 31 लाख वितरीत
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 12- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार शेतक:यांच्या खात्यावर कजर्माफीची 474 कोटी 31 लाखाची रक्कम वर्ग करण्यात आली आह़े एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कजर्माफीची रक्कम वितरीत करण्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी केला आह़े
गेल्या जुलैअखेर पासून या योजनेंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली.
कर्जमाफीच्या पात्र शेतक-यांच्या याद्या मात्र शासनाकडून अपलोड होत नव्हत्या. त्यात त्रुटी आढळून आल्याने नव्याने माहिती अपलोड करण्याची वेळ आली. यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात कर्जमाफी प्रक्रियेते घोळ उघडकीस आला. नंतर काही याद्या अपलोड होत गेल्या. शासनाने दिवाळीपूर्वी शेतक-यांना कजर्माफीचा लाभ देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी तातडीने कार्यक्रम घेऊन जिल्ह्यातील 32 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्रही वाटप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर मात्र माहितीमध्ये त्रुटी असल्याने याद्या जाहीर होत नव्हत्या. आज अखेर जिल्ह्यात 1 लाख 49 हजार 161 शेतक-यांना 474 कोटी 31 लाखाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. इतर शेतक:यांच्या खात्यावर लवकरच रक्कम देण्यात येईल, असे सहकार विभागातर्फे सांगण्यात आले.
दिवाळीनंतर आला कामाला वेग
जुलै अखेर कजर्माफीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती़ मात्र प्रत्यक्ष दिवाळीनंतर कामाला वेग आला़ नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला़ पत्रकारांशी बोलताना त्यांनी शेतक:यांची कजर्माफीसाठी तयार करण्यात आलेल्या यादीची बँकाकडून त्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती दिली होती़ तसेच 15 डिसेंबर्पयत 2 लाखा पेक्षा अधिक शेतक-यांच्या खात्यावर कजर्माफीची रक्कम वर्ग करण्यात होईल, असा विश्वासही व्यक्त केला होता़ हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच रक्कम खात्यावर जमा झाल्याने चर्चाना उधाण आले आह़े