कर्ज वसुलीस स्थगिती असतानाही मनरेगीची रक्कम कर्ज खात्यात वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 03:33 PM2019-01-02T15:33:11+5:302019-01-02T15:34:46+5:30

मजुरीचे पैसे लाभार्थ्यांना देण्याची मागणी

 The amount of MNREGA loan account despite the suspension of the loan | कर्ज वसुलीस स्थगिती असतानाही मनरेगीची रक्कम कर्ज खात्यात वर्ग

कर्ज वसुलीस स्थगिती असतानाही मनरेगीची रक्कम कर्ज खात्यात वर्ग

googlenewsNext

चाळीसगाव : दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांकडील सर्व कर्ज वसुलीस स्थगिती दिली असतानाही रोजगार हमी योजनेच्या मजुरीची रक्कम कर्ज खात्यात जमा करत असल्याने लाभार्थ्यांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही रक्कम कर्ज खात्यात जमा न करता लाभार्थ्यांना देण्याची मागणी शेतकरी कृती समितीतर्फे करण्यात आली असून या विषयी तहसीलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्ज माफीची अद्यापही अंमलबजावणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे अनेक पात्र कर्जधारक शेतकºयांच्या नावावर थकबाकी दिसत असल्याने कर्ज माफी जाहीर करून राज्य सरकारने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहे. या वर्षी तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असल्याने शेतकºयांकडील सर्व कर्ज वसुलीस स्थगिती असून तसे आदेशही असताना संबंधीत बँका रोजगार हमी योजनेचे पैसे कर्ज खात्यात जमा करत आहेत.
शासनाने संबंधीत बँकांना आदेश देऊन रोजगार हमी योजनेचे पैसे शेतकरी तसेच लाभार्थी मजुराना तात्काळ अदा व्हावे असे न झाल्यास शेतकºयांसह चाळीसगाव तहसील कार्यालय समोर शेतकरी कृती समिती रयत सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर शेतकरी कृती समिती समन्वयक विवेक रणदिवे, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रमोद पाटील, भानुदास पाटील, रमेश पाटील, गोविंदा पाटील, कैलास पाटील, रावण पाटील, दगडू निकम, बाबुराव पाटील, युवराज पाटील, तुकाराम पाटील, जिजाबाई पाटील, शिवाजी पाटील, श्रावण पाटील यांच्यासह तालुक्यातील शेतकºयांच्या सह्या आहेत.

Web Title:  The amount of MNREGA loan account despite the suspension of the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव