सुप्रीम कॉलनीत उद्या घेणार ‘अमृत’ची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:15+5:302021-02-13T04:17:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीवासीयांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघूरच्या मुख्य ...

'Amrut' to be tested in Supreme Colony tomorrow | सुप्रीम कॉलनीत उद्या घेणार ‘अमृत’ची चाचणी

सुप्रीम कॉलनीत उद्या घेणार ‘अमृत’ची चाचणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनीवासीयांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला अमृत जलवाहिनी जोडण्याचे दोन दिवस सुरू असलेले काम शुक्रवारी पहाटे ६ वाजता संपले. सुप्रीम कॉलनी भागातील १५ लक्ष लीटरची टाकी भरण्याचे काम शनिवारी होणार असून, या भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भात रविवारी चाचणी होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली. महापौर भारती सोनवणे यांनी दुपारी कामाची पाहणी केली. दरम्यान, साहित्या नगरात अमृतची पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता तत्काळ काम हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन जोडणी आणि भूमिगत पाणी साठवण टाकीची पाहणी करताना महापौरांसह स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, मनपा अभियंता योगेश बोरोले, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत १५ लक्ष लीटरची भूमिगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली असून त्याठिकाणी उच्च क्षमतेचे २ पंप बसविण्यात आले आहेत. शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस चालणार असून शनिवारी दुपारी सुप्रीम कॉलनीची टाकी भरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर रविवारी चाचणी घेतली जाणार आहे. सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्या नगरात अद्याप अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून नागरिकांना १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. महापौरांकडे या भागातील नागरिकांनी याबाबत तक्रार केली असता त्यांनी मनपा अभियंता आणि मक्तेदार प्रतिनिधीकडून माहिती घेतली. नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृतची पाईपलाईन टाकण्याचे काम दोन दिवसात हाती घेत १ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

Web Title: 'Amrut' to be tested in Supreme Colony tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.