मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार

By Atul.jaiswal | Published: January 24, 2024 12:51 PM2024-01-24T12:51:04+5:302024-01-24T12:52:03+5:30

२७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

An extraordinary view of Mars-Mercury conjunction on Saturday | मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार

मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार

अकोला : आपला चंद्र आकाशात दररोज बारा अंश पुढे सरकत असल्याने दर महिन्याला प्रत्येक ग्रहाची आणि चंद्राची युती घडून येते त्यामुळे आकाशात ग्रहाची ओळख सहज करता येते. चंद्राप्रमाणेच ग्रह सुध्दा ठराविक कालावधीत एकमेकांच्या जवळ येतात. सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळ असलेला बुध ग्रह आणि पृथ्वी नंतरचा मंगळ ग्रह शनिवार, २७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

बुध ग्रह सूर्याच्या जवळ आणि अंतर्ग्रह असल्याने केवळ सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर फार कमी वेळ या ग्रहाचे दर्शन घडते. दूर्बिणीतून या ग्रहाच्या चंद्राप्रमाणे विविध कला पाहता येतात. सध्या एकादशीच्या कलेप्रमाणे दिसेल. आकाशात लालसर रंगाचा मंगळ ग्रह लवकर लक्षात येत असल्याने त्याचे आधारे बुध ग्रहाचे दर्शन अधिक सुलभ होईल. हे दोन्ही ग्रह सध्या धनु राशीत २२व्या अंशावर आहेत. रात्री दहा वाजता या दोन ग्रहांमधील अंतर सर्वात कमी असेल. अशाच प्रकारे मंगळ ग्रह येत्या २२ फेब्रुवारी रोजी शूक्र ग्रहाजवळ असेल. या अनोख्या दृष्याचा आनंद नुसत्या डोळ्यांनी घेता येईल, असे दोड यांनी सांगितले.

Web Title: An extraordinary view of Mars-Mercury conjunction on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.