रुग्णवाढीसोबत मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:32 AM2020-06-13T11:32:07+5:302020-06-13T11:32:40+5:30

बैठक : अपर मुख्य सचिवांचे आदेश

Analyze the cause of death as the patient progresses | रुग्णवाढीसोबत मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा

रुग्णवाढीसोबत मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करा

Next

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत सतर्क राहून काम करणे आवश्यक आहे. रुग्णवाढीसाठीसोबत मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करावे, असे आदेश राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिले.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक नाशिक येथे शुक्रवारी झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.
प्रतिबंधित क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत जीवनावश्यक व अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याचे नियोजनही करावे, असेही करीर यांनी सांगितले.

नितीन करीर यांनी केलेल्या सूचना
-राज्यातील कोरोना संसर्गाच्या फैलावाचे विश्लेषण केले जात असून त्यात प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या कोरोना संसर्गाची कारणे ही समान आढळून आले आहेत.
-जळगाव जिल्हा याला अपवाद असून येथे कोरोना फैलावाचे स्वतंत्र विश्लेषण प्रशासनाने केल्याशिवाय त्यात ठोस उपाययोजना करता येणार नाहीत.
-जेवढ्या जास्त तपासण्या (टेस्ट) तेवढे रुग्ण असणार व जेवढ्या जास्त प्रमाणात सर्वेक्षण केले तेवढ्या जास्त प्रमाणात या संसर्गाचा अंदाज प्रशासनाला घेता येतो.
-जळगावात रुग्णवाढीसोबतच कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचेही विश्लेषण होणे गरजेचे आहे. जळगावात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ असून या मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे.

एसआयटीत यांचा आहे सहभाग
जळगाव : कोविड रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी चार अधिकारी व चार कर्मचारी मिळून ८ जणांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्यात जिल्हा पेठचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे, एमआयडीसीचे उपनिरीक्षक संदीप पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंगद नेमाने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार जितेंद्र पाटील, महेश महाजन व महेश पाटील यांचा समावेश आहे. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांचे समितीवर नियंत्रण आहे.

Web Title: Analyze the cause of death as the patient progresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.