जळगावच्या क्रीडाक्षेत्रात पुरस्काराने आनंदलहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:33 PM2018-02-13T13:33:10+5:302018-02-13T13:34:51+5:30

क्रीडा समन्वयक ते गुणवंत क्रीडा संघटक

Anandalhar award in Jalgaon sports field | जळगावच्या क्रीडाक्षेत्रात पुरस्काराने आनंदलहर

जळगावच्या क्रीडाक्षेत्रात पुरस्काराने आनंदलहर

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १३ - राज्य शासनाने गेल्या तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सोमवारी घोषणा केली. त्यात जळगाव जिल्ह्यातील क्रीडा संघटक फारूक शेख अब्दुल्ला यांना सन २०१४-१५ साठी तर डॉ.प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांना २०१६-१७ साठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (संघटक/कार्यकर्ते) नाशिक विभागातून जाहीर झाला आहे.
क्रीडा समन्वयक ते गुणवंत क्रीडा संघटक
जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रीडा समन्वयक असलेले फारूक़ शेख यांचा हा सलग तिसरा शासकीय पुरस्कार आहे. त्यांना २०१५च्या जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक आणि २०१६च्या जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.जिल्हास्तरावर ९२, विभागीय ८, राज्यस्तरीय १२, राष्टÑीय स्तर आठ आणि दोन आंतरराष्टÑीय स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. आपल्या उमेदीच्या काळात त्यांनी हॉकी व फुटबॉलमध्ये नाव कमावले. जळगाव जिल्हा फुटबॉल असो.च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते महाराष्टÑ बुध्दिबळ संघटनेचे सचिव, राज्य अम्यच्युअर अ‍ॅक्वेटीक असो.चे सहसचिव आणि हॉकी, इनडोअर हॉकी, बॉडी बिल्डर असो या राज्य संघटनांचे उपाध्यक्ष आहेत. जिल्हा स्तरावर हॉकी, फुटबॉल, महिला हॉकी, मास्टर टेबल टेनिस, जलतरण, पॅराआॅलिम्पिक, इनडोअर हॉकी, स्क्वॅश, बिलियर्डस्, स्रुकर, आदी जिल्हा संघटनांचे सचिवपद तर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्षपद, टेबल टेनिस व क्रिकेट संघटनेचे संचालकपद भूषवित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचे हॉकी व फुटबॉलमध्ये आंतर विद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्टÑ चेस लीग, चेस इन स्कुल या उपक्रमांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
क्रीडा शिक्षक ते गुणवंत क्रीडा संघटक
शिक्षण प्रसारक मंडळाच्या ला.ना.सार्वजिनक विद्यालयात क्रीडाशिक्षक असलेले डॉ. तळवेलकर हे बीपीएड, एम फिल पदवीधारक असून निसर्गोपचारतज्ज्ञ आहेत. राज्य शासनाने अलीकडेच त्यांची क्रीडा तज्ज्ञांच्या समितीवर नेमणूक केली आहे. भारतीय सॉफ्टबॉल असो.चे सहसचिव, राज्य सॉफ्टबॉल असो.चे सचिव, राज्य बॉल बॅडमिंटन असो.चे ते सचिव आहेत. याशिवाय क्रीडा भारती, सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, सेपाक टकारा, थ्रो बॉल, वूड बॉल, माँटेक्सबॉल या संघटनांचे ते जिल्हा सचिव आहेत. तलवारबाजी व आट्यापाट्या जिल्हा संघटनांच्या खजिनदारपदीही ते आहेत. आपल्या उमेदीच्या काळात उत्तम कबड्डीपटू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी ज्युनियर गटात राष्टÑीय कबडडी आणि दोन वेळा अ.भा.आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा खेळली आहे.
यापूर्वी त्यांना जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट क्रीडा शिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे उत्कृष्ट प्रशिक्षक व सर्वोत्तम क्रीडा संघटक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आशियाई ज्युनियर सॉफ्टबॉल स्पर्धा (२००० व २०१०) या आंतरराष्टÑीय स्पर्धेच्या आयोजनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
हा पुरस्कार माझा नाही तर जळगावकरांचा आहे. सलग तिसºया वर्षी राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच. शिवाय शासकीय पुरस्कारांची हॅटट्रीक राज्य पुरस्काराने पूर्ण झाल्याचा अत्यानंद आहे. २०१६ मध्ये जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भंवरलालजी जैन यांनी आपल्याला जिल्हा पुरस्कारांवर थांबायचे नाही, राज्य पुरस्कारांजोगे काम करायचे आहे असे प्रोत्साहन दिले होते त्यांचे शब्द आज आठवतात.
-फारूक शेख अब्दुल्ला

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा संघटक
क्रीडा क्षेत्रात काम केल्यानंतर पालक, खेळाडू व सहकारी क्रीडा संघटकांकडून आपल्या कामगिरीची दखल घेतली गेलेली होतीच, परंतु आता शासन दरबारीसुद्धा अधिकृतरित्या दखल घेण्यात आल्याने साहजिकच आनंद झाला. गेल्या २५ ते ३० वर्षातील मेहनतीचे चीज झाले. या काळात सॉफ्टबॉल, बॉल बॅडमिंटन, तलवारबाजी, बेसबॉल, आट्या पाट्या अशा प्रवाहाबाहेरच्या खेळांच्या प्रचार-प्रसारासाठी झटलो.
- डॉ. प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेले क्रीडा संघटक

Web Title: Anandalhar award in Jalgaon sports field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.