..तर सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 05:21 PM2017-08-08T17:21:04+5:302017-08-08T17:28:17+5:30

नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना नोटीस देत वेधले होते लक्ष

..and collective leave agitation | ..तर सामूहिक रजा आंदोलन

..तर सामूहिक रजा आंदोलन

Next
ठळक मुद्दे9 ऑगस्ट रोजी सामुहिक रजा आंदोलन 10 रोजी शासनाचा निषेध म्हणून काळय़ा फिती लावून काम 15 रोजी आमदारांना भेटून निवेदन 21 पासून बेमूदत काम बंद आंदोलन

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.8 - नगरपालिका कर्मचा:यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात समन्वय समितीने यापूर्वी मुख्यमंत्र्यांना नोटीस देऊन या आंदोलनाकडे लक्ष वेधले होते. राज्य कर्मचा:यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. न.पा. कर्मचा:यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करुन मागण्या मंजूर करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना 11 रोजी नोटीस देवून लक्ष वेधण्यात आले होते. 9 रोजी एक दिवस सामूहिक रजा घेवून नगरपालिका कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात येईल. 10 रोजी शासनाचा निषेध म्हणून काळय़ा फिती लावून काम करण्यात येईल. 15 रोजी आमदारांना भेटून निवेदन देण्यात येईल. मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले तर 21 पासून बेमूदत काम बंद आंदोलन संप करण्यात येणार आहे. राज्य नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी कर्मचारी व संवर्ग कर्मचारी कामगार संघटना संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यातील सर्व सफाई कामगार संघटना व इतर नगरपालिकामधील कामगार संघटनातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारला असल्याची माहिती वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू खरारे यांनी दिली आहे.

Web Title: ..and collective leave agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.