अन् कुटुंब नायकांना अश्रू झाले अनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:05 PM2018-02-04T13:05:22+5:302018-02-04T13:05:31+5:30
लेवा पाटील समाज राष्ट्रीय महाअधिवेश
वासुदेव सरोदे / ऑनलाईन लोकमत
पाडळसे, जि. जळगाव, दि. 4 - घराची जबाबदारी संभाळत समाजासाठी अहोरात्र काम करीत आईच्या माध्यमातून मुलांवर उत्तम संस्कार करणा:या कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांच्याबद्दलचे गौरोद्वार मुलीच्या तोंडून ऐकून अधिवेशनस्थळी कुटुंब नायकांना अश्रू अनावर झाले.
भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे आयोजित लेवा पाटील समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर कुटुंबनायक यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करण्यासाठी कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांच्या कन्या भाग्यश्री पाचपांडे आल्या व त्यांनी कुटुंबातील स्थितीचे वर्णन केले.
या वेळी त्या म्हणाल्या की, वडिलांनी समाजासाठी स्वत:ला झोकून देत समाजाच्या उन्नतीसाठी सदैव पुढाकार घेतला. रात्रंदिवस समाजासाठी काम करीत असताना घराकडे दुर्लक्ष होत होते. मात्र आई इंदिरा पाटील यांनी घरात सर्व मुलांवर उत्तम संस्कार केले व त्यातून सर्व भावंडे चांगली प्रगती साधू शकले. समाजाच्या साक्षीने मुलीच्या तोंडून हे गौरोद्वार ऐकताच कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी अश्रू अनावर झाले.