अन् त्यांनी कर्तव्यासोबतच जोपासली माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:24 PM2017-08-24T17:24:24+5:302017-08-24T17:28:15+5:30

अमळनेर तहसीलदारांनी एका अपघातग्रस्ताला केले रूग्णालयात दाखल

And he also worked with the duties of humanity | अन् त्यांनी कर्तव्यासोबतच जोपासली माणुसकी

अन् त्यांनी कर्तव्यासोबतच जोपासली माणुसकी

Next
ठळक मुद्देगौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कारवाईसाठी जात होते तहसीलदार. पारोळा रस्त्यावरील जिनिंगजवळ झाला पितांबर कदम यांचा अपघात.मदत केल्याने नातेवाईकांनी मानले तहसीलदारांचे आभार

आॅनलाईन लोकमत 
अमळनेर, दि.२४ - गौण खनिज वाहतूक करणाºया वाहनांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अपघातात जखमी होऊन विव्हळणाºया  वृद्धाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत माणुसकीचे दर्शन  घडविले. 
सावखेडा येथील पितांबर पोपट कदम (६३) हे  २४ रोजी दुपारी साडेबारा  वाजता बहीण सुरेखा बारकू पाटील यांना मोटरसायकलवर बसवून सुनेला पाहण्यासाठी पारोळा येथे जात होते. पारोळा रस्त्यावरील जिनिंग जवळ मोटारसायकलचे संतुलन बिघडल्याने पुढे जाणाºया वाहनाला त्यांची जोरात धडक लागली. त्यात पितांबर पाटील जखमी झाले. त्यांच्या हाताला व पायाला  तसेच डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला विव्हळत पडले होते. त्याचवेळी तहसीलदार प्रदीप पाटील, लिपिक नितीन ढोकणे, चालक देवीदास नगराळे  हे बहादरवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांना पकडण्यासाठी जात होते.  तहसीलदार प्रदीप पाटोल यांनी गाडी थांबवून वृद्धाला शासकीय वाहनात बसवून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  डॉ प्रकाश ताडे, डॉ.जी.एम.पायील यांनी त्वरित उपचार सुरू केले. फ्रॅक्चर असल्याने पितांबर पाटील यांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञाकडे पाठवण्यात आले. कर्तव्यापेक्षा अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्याची माणुसकीला महत्व देणाºया तहसीलदारांचे आभार मानायला मात्र रुग्णांचे नातेवाईक विसरले नाहीत.
 

Web Title: And he also worked with the duties of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.