मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 04:37 PM2017-10-05T16:37:25+5:302017-10-05T16:39:31+5:30
गांधी उद्यानापासून निघाला मोर्चा: केंद्र व राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा
Next
ठळक मुद्देमोर्चास दीड तास उशीरजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडविला मोर्चा
ल कमत आॅनलाईनजळगाव, दि.५- मानधन वाढ करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनी गुरूवार दि.५ रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन स्वत:ला अटक करवून घेत जेलभरो आंदोलन केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. आयटक व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे शहरातील गांधी उद्यानापासून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यास तब्बल दीड तास उशीर झाला. साडेबारा वाजेच्या सुमारास महात्मा गांधी उद्यानापासून मोर्चास प्रारंभ झाला. त्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी,बालवाडी सेविका हातात घोषणांचे फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दुपारी १ वाजेच्या सुमारास हा मोर्चा धडकला. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हा मोर्चा अडविला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कॉ.अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढीच्या तसेच सरकारकडून मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. अटक व सुटकात्यानंतर या अंगणवाडी सेविकांनी स्वत:ला अटक करवून घेतली. पोलिसांनी या सेविकांना अटक करून नंतर सोडून दिले. या आहेत मागण्या१)दिल्ली, केरळ, बंगलोर, तामीळनाडू, पांडेचेरी या राज्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात बºयापैकी वाढ केली आहे. महाराष्टÑ सरकारनेही सेविका, मदतनिसांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता वेतन वाढीचा निर्णय घ्यावा. २)सेवानिवृत्ती नंतर लाभाची रक्कम २ लाख रूपये करावी. दरमहा ५ हजार रूपये निवृत्तीवेतन मिळावे, ३), टीएचआर बंद करा. त्याऐवजी दर्जेदार खाऊसाठी आवश्यक ती तरतूद करा, ४) मिनी अंगणवाडी केंद्र पूर्ण केंद्रात रूपांतरीत करा.५) अंगणवाड्यांची स्टेशनरी साहित्य सरकारने पुरवावीत. ६) दरमहा १ तारखेपर्यंत मानधन मिळावे. ७) १ महिन्याच्या मानधनाइतका दिवाळी बोनस मिळावा. ८)अंगणवाड्यांचे खाजगीकरण नको. आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.