अंगणवाडी कर्मचा:यांना मिळणार भविष्य निर्वाह निधीचा लाभ..

By admin | Published: March 31, 2017 03:51 PM2017-03-31T15:51:04+5:302017-03-31T15:51:04+5:30

देशभरातील 61 लाख 50 हजार अंगणवाडी कर्मचा:यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व लाभणार असून त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Anganwadi workers will get the benefit of the provident fund. | अंगणवाडी कर्मचा:यांना मिळणार भविष्य निर्वाह निधीचा लाभ..

अंगणवाडी कर्मचा:यांना मिळणार भविष्य निर्वाह निधीचा लाभ..

Next
>जळगाव, दि.31- देशभरातील 61 लाख 50 हजार अंगणवाडी कर्मचा:यांना भविष्य निर्वाह निधीचे सभासदत्व लाभणार असून त्यांचा या निधीतील स्वहिस्सा शासन भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
विविध संघटनांकडून पाठपुरावा
या कर्मचा:यांना वाढीव वेतन मिळावे, त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा यासाठी भारतीय मजदूर संघ व विविध कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा सुरू होता. या मागणीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत गुरूवारी चर्चा झाली. अध्यक्षस्थानी कामगार मंत्री दत्तात्रय बंडारू हे होते. 
61 लाख 50 हजार कर्मचारी
अंगणवाडी क्षेत्रात 61 लाख 50 हजार कर्मचारी आहेत. यात अंगणवाडी कर्मचारी 14 लाख, अंगणवाडी सेविका 12 लाख, आशा वर्कर 10 लाख व माध्यान्य भोजन कर्मचारी 25 लाख 50 हजार असे देशभरातील विविध प्रांतात काम करतात. 

Web Title: Anganwadi workers will get the benefit of the provident fund.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.