निलंबित केल्याचा राग अनावर......., महिला वाहकाने विभाग नियंत्रकाच्या डोळ्यात फवारला मिरचीचा स्प्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:55 PM2020-02-07T12:55:13+5:302020-02-07T12:55:49+5:30

महिलेला अटक व सुटका

Anger of suspending Anonymous | निलंबित केल्याचा राग अनावर......., महिला वाहकाने विभाग नियंत्रकाच्या डोळ्यात फवारला मिरचीचा स्प्रे

निलंबित केल्याचा राग अनावर......., महिला वाहकाने विभाग नियंत्रकाच्या डोळ्यात फवारला मिरचीचा स्प्रे

Next

जळगाव : अक्कलकुवा जि.धुळे येथे कार्यरत असतानाच्या वादातून महिला वाहकाने एस.टी.महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्या डोळ्यात मिरची पावडरचे पाणी केलेला स्प्रे फवारल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता जळगाव आगारात घडली. याप्रकरणी वाहक सुनीता लोहार यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून लोहार यांना अटक करण्यात आली, त्यानंतर सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली.
गुरुवारी सकाळी १० वाजता देवरे साफसफाई बाबत स्थानक प्रमुख निलीमा बागुल यांना सूचना देत असताना अक्कलकुवा आगाराच्या वाहक सुनीता लोहार या देवरे यांच्या दालनाकडून आरडाओरड करीत जिन्याकडे आल्या व काही कळण्याच्या आतच त्यांनी मिरची पावडरचे पाणी बाटलीच्या स्प्रेमधून देवरे यांच्या डोळ्यात फवारले. प्रचंड आग व भोवळसारखा प्रकार झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी देवरे यांना तत्काळ डोळ्यांच्या डॉक्टरकडे नेले. तेथे उपचार केल्यानंतर दुसºया खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर देवरे यांनी जिल्हा पेठ पोलिसात लोहार यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहक महिलेस ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी महिलेकडून प्रकार जाणून घेतला.
अनेक तक्रारीनंतर झाले होते निलंबन
राजेंद्र देवरे हे अडीच वषार्पूर्वी धुळे विभागात नियंत्रक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी वाहक सुनीता लोहार यांच्याविरोधात डेपोमध्ये अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. तसेच महिलेचे वर्तन अरेरावीचे, वरीष्ठांचे काही एक ऐकून न घेता वादविवाद करण्यासारखे होते. सात-आठ तक्रारीवरून महिलेचा निलंबनाचा प्रस्ताव वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवुन तिला निलंबित केले होते. याचा राग धरून लोहार यांनी देवरे यांच्यावर मिरची पुड स्प्रे मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान विभाग नियंत्रक देवरे यांच्यावर धुळे येथे असताना विनयभगांचाही गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले.

पैसे काढण्यासाठी बँकेत आलेली होती़ त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक होते़ बँक बंद असल्याने मी जीन्यात मेहुण्यांसोबत उभी असताना देवरे आले व त्यांनी माझा हात पकडून मुरगळला स्वसुरक्षेसाठी शेवटी काही ना काही करावेच लागेल म्हणून मी तसे केले़ तेच ओरडत खाली आले़ या ठिकाणी माझ्या अनेक वस्तू गहाळ झाल्या़ मी पोलिसात फिर्याद दिली. मात्र ती घेतली गेली नाही़
-सुनिता लोहार, महिला वाहक

सुनिता लोहार या धुळे विभागातील वाहक होत्या़ प्रवाशांना, अधिकाऱ्यांना मारहाण करण्यासह त्यांच्याविषयी धुळे विभागात असताना प्रचंड तक्रारी होत्या़ वरिष्ठांकडून विचारणा झाल्यानंतर त्यांना निलंबित केले होते़ त्यानंतर त्यांची अक्कलकुवा येथे बदलीही केली होती़ याचा राग मनात ठेवून त्यांनी आज जिन्यात चिली-स्प्रे माझ्यावर मारला़ याबाबत तक्रार दिली आहे.
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक

Web Title: Anger of suspending Anonymous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव