वेफर्सचे पैस मागितल्याचा राग आल्याने चेह-यावर केला वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:37+5:302021-01-09T04:13:37+5:30
०९ सीटीआर ३८ - रक्तभंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात आलेला जखमी विजय भोई ०९ सीटीआर ३५ - रूग्णालयात उपचार झाल्यानंतर ...
०९ सीटीआर ३८ - रक्तभंबाळ अवस्थेत पोलीस ठाण्यात आलेला जखमी विजय भोई
०९ सीटीआर ३५ - रूग्णालयात उपचार झाल्यानंतर चेह-यावर पडलेले टाके
०९ सीटीआर ३६ - जिल्हा रूग्णालयात जखमी विजय भोईवर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - वेफर्सचे पैसे मागितले म्हणून गांधी मार्केटजवळील वेफर्स विक्रेता विजय आत्मारात भोई (३०, रा. शाहू नगर) या तरुणाच्या चेह-यावर गांजाच्या नशेत तर्रर्रर असलेल्या तरुणाने धारदार पट्टीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास घडली. धारधार पट्टीने हल्ला होताच तरूणाच्या चेह-यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्याच अवस्थेत तो शहर पोलीस ठाण्यात धावत आल्याने जागो-जागी रक्त पडलेले होते. तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.
शाहूनगरातील रहिवासी विजय आत्माराम भोई हा तरुण गांधी मार्केटच्या बाहेर वेफर्स विक्री करतो. शुक्रवारी दुपारच्या सुमारास बाळू नावाचा तरुण त्याठिकाणी आला. त्याने विजयला वेफर्स मागितले असता त्याने वेफर्स घेतले. परंतु, वेफर्सचे पैसे न देता उलट विजयलाच शिवीगाळ करु लागला. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. पैस न मिळाल्यामुळे विजय शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. पोलिसांनी तक्रार ऐकून घेतल्यानंतर शिवीगाळ करणा-या बाळूला पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवले. काही वेळाने पोलिसांनी दोघांना समज देवून त्यांना परत पाठवून दिले.
तो आला...आणि पट्टीने केला वार
सायंकाळच्या सुमारास बाळू हा पुन्हा गांजाच्या नशेत विजयकडे आला आणि त्याला पुन्हा शिवीगाळ करु लागला. यावेळी विजयने पोलिस ठाण्यात फोन करीत पुन्हा शिवीगाळ करीत असल्याचे सांगताच बाळूने त्याच्याकडील धारदार पट्टीने विजयच्या चेहºयावर वार केला. नंतर बाळू घटनास्थळहून पसार झाला.
रक्ताची धार वाहू लागली...
धारदार पट्टीने विजय भोईच्या चेह-यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेतच इतर विक्रेत्यांनी त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी त्याचे संपुर्ण कपडे रक्ताने माखले होते. अक्षरश: विजयच्या चेह-यातून रक्ताची धार वाहत होती. हा प्रकार पोलिसांनी पाहताच, त्याला तात्काळ रूग्णालयात जाण्यास सांगितले. नंतर त्याला रिक्षातून रूग्णालयात हलविण्यात आले.