मुलाला चिडवू नका सांगितल्याचा राग येऊन मायलेकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:42+5:302020-12-22T04:16:42+5:30

जळगाव : मुलाला तोतरा, बोबडा म्हणून चिडवू नका असे सांगितल्याचा राग येऊन भूषण माळी व सचिन चौधरी (दोन्ही ...

Angered at being told not to tease the child, Milekas was beaten | मुलाला चिडवू नका सांगितल्याचा राग येऊन मायलेकास मारहाण

मुलाला चिडवू नका सांगितल्याचा राग येऊन मायलेकास मारहाण

Next

जळगाव : मुलाला तोतरा, बोबडा म्हणून चिडवू नका असे सांगितल्याचा राग येऊन भूषण माळी व सचिन चौधरी (दोन्ही रा.तुकारामवाडी) या दोघांनी मंगला दीपक भदाणे (३६) व त्यांच्या मुलास फरशी व सायकलीने मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता तुकारामवाडीत घडली. याप्रकरणी दोघांविरुध्द सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगला भदाणे या मुलाला घेऊन रविवारी सायंकाळी भाजीपाला घ्यायला जात असताना भूषण व सचिन यांनी भदाणे यांच्या मुलाला बोबडा, तोतरा म्हणत चिडवले. भदाणे यांनी त्याचा जाब विचारला असता दोघांनी मायलेकाच्या डोक्यात फरशी मारुन सायकलीने मारहाण केली. या गुन्ह्याचा तपास गणेश शिरसाळे करीत आहे.

चौघुले प्लॉट वाद प्रकरणी दोघांना अटक

जळगाव :चौघुले प्लॉट परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात दीपक दत्तू चौधरी व मनोज उर्फ काल्या दत्तू चौधरी या दोघांना शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली. पूर्ववैमनस्यातून रविवारी ही घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या गटातील अटक केलेले हितेश शिंदे, संतोष शिंदे, आकाश शिंदे, संजय शिंदे यांना न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला आहे.

त्या रिक्षा चालकास अटक

जळगाव : वाहतूक पोलिसाशी वाद घालून रिक्षा पलटी करणाऱ्या चंद्रकात विष्णू अभंगे (रा.कंजरवाडा) या रिक्षा चालकास शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली. शहर वाहतुक शाखेचे कर्मचारी कमलाकर तुकाराम बडगुजर यांनी गेल्या आठवड्यात अभंगे याला हटकले असता त्याने त्यांच्यासोबत वाद घालून बडगुजर यांना रिक्षात बसवून सिंधी कॉलनीकडे नेत रिक्षा पलटी केली होती. याप्रकरणी रिक्षाचालक चंद्रकात विष्णू अभंगे, चंदाबाई विष्णू अभंगे व मुकेश विष्णू अभंगे या तिघांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी चंद्रकांत विष्णू अभंगे याला अटक करण्यात आली आहे. अद्याप दोन जण फरार आहेत.

Web Title: Angered at being told not to tease the child, Milekas was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.