भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 08:12 PM2018-07-11T20:12:08+5:302018-07-11T20:14:45+5:30

मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Angered by the BJP's deprived loyalists is natural: Eknathrao Khadse | भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे

भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे

Next
ठळक मुद्देपैशावाल्यांचा पक्ष बाबत मतदारच उत्तर देतीलभाजपा कार्यकर्त्यांनी केली जाहिर टिकाउमेदवारीवर पहिला हक्क कार्यकर्त्यांचाच

जळगाव- मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच भाजपा हा पैसेवाल्यांचा पक्ष झाल्याचा आरोप होत असल्याबद्दल प्रतिक्रिया न देता मतदार याचे उत्तर देतील, असेही ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
भारतीय जनता पार्टीने मोठ्या संख्येने उमेदवार इतर पक्षातून आयात केल्याने पक्षातील पृथ्वीराज सोनवणे व जयश्री नितीन पाटील या दोघा नगरसेवकांचे तर तिकिट कापलेच गेले परंतु इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उमेदवारीची संधी हुकली यामुळे पक्षातील निष्ठावंतांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पृथ्वीराज सोनवणे व महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी तर भाजपा हा पैशावाल्यांचा पक्ष झाला असल्याची टीका जाहीरपणे केली आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पक्षात अचानक प्रवेश करुन उमेदवारी करणाऱ्यांमुळे जर निष्ठावंत डावलेले जात असतील तर त्यांची नाराजी ही स्वाभाविक आहे. उमेदवारीवर पहिला हक्क हा वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाºया कार्यकर्त्यांचाच आहे. दरम्यान भाजपा हा पैशावाल्यांचा पक्ष झाल्याचा आरोप आता भाजपातीलच नाराजांकडून होत असल्याबद्दल ते म्हणाले की, याबाबत मी याबाबत काही बोलण्यापेक्षा मतदारांकडून या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीतून मिळेल.

Web Title: Angered by the BJP's deprived loyalists is natural: Eknathrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.