मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 07:35 PM2018-11-27T19:35:52+5:302018-11-27T19:37:36+5:30

मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व एनए मान्यता रद्द करावे या विषयांसह कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाºयांच्या भूमिकेविरुद्ध नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली

Angry in the meeting against the role of the Chief Officials of Muktainagar Nagar Panchayat | मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी

मुक्ताईनगर नगरपंचायतीत कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेविरुद्ध सभेत नाराजी

Next
ठळक मुद्देकचरा व्यवस्थापनाबाबत घोळ यावरदेखील आणि सर्वसामान्यांची निव्वळ ई- टेंडरींगच्या फेºयात फिरणाºया व विविध विकास कामे रेंगाळलीअश्वारुढ पुतळ्याबाबत समिती तत्काळ स्थापन करण्याची मागणीविकासकाने मूलभूत सुविधा केल्या नसतील तर त्या एनए परवानग्या तत्काळ रद्द करण्यात याव्यात

मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व एनए मान्यता रद्द करावे या विषयांसह कामे रेंगाळत ठेवण्याच्या मुख्याधिकाºयांच्या भूमिकेविरुद्ध नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
कचरा व्यवस्थापनाबाबत घोळ यावरदेखील आणि सर्वसामान्यांची निव्वळ ई- टेंडरींगच्या फेºयात फिरणाºया व विविध विकास कामे रेंगाळत असल्याचे, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याबाबत तत्काळ समिती स्थापन करण्याची एकमुखी मागणी सभागृहात झाली, तर ज्या ठिकाणी पुतळा उभारण्याची घोषणा केली ती जागा अतिक्रमणधारक न्यायालयात गेल्याने ही जागा वादातीत आहे. या जागेला ताब्यात घेण्याबाबत नगरपंचायतीने का कारवाई केली नाही, असा आक्षेप विरोधी बाकावरुन नगरसेवक संतोष मराठे यांनी घेतला, यावर मुख्याधिकाºयांनी याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
एक वर्षापूर्वीपर्यंत दिलेल्या बांधकाम परवानगीत प्रत्यक्ष कामास सुरवात नसेल तर परवानगी रद्द करावी व एनए आॅर्डर दिल्यानंतर विकासकाने रस्ते गटारी वीज खांब या मूलभूत सुविधा केल्या नसतील तर त्या एनए परवानग्या तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात याव्या, अशी लेखी मागणी करण्यात आली. यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी अनुमोदन दिले. तसेच सभागृहात शहरातील गटारी दुरुस्ती व गटारीवरील ढापे बांधकामाचा मार्ग तत्काळ काढण्यात यावा, अशी मागणी सर्व नगरसेवकांनी लावून धरल्याने मुख्याधिकाºयांनी लवकरात लवकर सदर कामे करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांना घरकुल व आदी कामांसाठी जुने भोगवटाधारकांना उतारे उपलब्ध करूनदेण्यात यावे जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीला वॉल कंपाउंडने संरक्षित करण्याची मागणी करण्यात आली.
सभागृहात मुख्याधिकारी श्याम गोसावी, बांधकाम उपअभियंता सावखेडकर, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, गटनेता पीयूष महाजन, शिवसेना गटनेता राजेंद्र हिवराळे, नगरसेवक सविता भलभले, कुंदा पाटील, बिलकिस बी बागवान, मुकेश वानखेडे, संतोष कोळी, मस्तान कुरेशी, संतोष मराठे, नीलेश शिरसाठ, शकील शेख, डॉ.प्रदीप पाटील, ललित महाजन आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Angry in the meeting against the role of the Chief Officials of Muktainagar Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.