नाराज सदस्य दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:43 PM2019-11-20T12:43:48+5:302019-11-20T12:44:09+5:30
तांत्रिक मान्यतांच्या चौकशीची मागणी: ३८ सदस्य विरोधात, दिवसभर सदस्य रूममध्ये अभ्यास
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सेस व अन्य हेडच्या निधीमध्ये मोठा घोळ झाला असून प्रमा व तांत्रिक मान्यतांची चौकशी करावी, अशी मागणी निधीवरून नाराज गटाने केली आहे़ त्यांनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले़ दरम्यान, या सदस्यांनी दिवसभर सदस्य रूमध्ये थांबून सर्व बाबींचा अभ्यास करून ३८ सदस्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सायंकाळी अधिकाºयांना दिले़
जिल्हा नियोजनकडून येणाºया निधीपैकी तीस टक्के निधीतून परस्पर कामे वाटप केल्याचा आरोप या सदस्यांनी केला असून या मुद्दयावरून गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत वादळ उठले आहे़ या नाराज सदस्यांना पाठिंबा वाढत असून मंगळवारी माधुरी अत्तरदे यांनी पाठिंबा दिला़ शिवाय शिवसेना सदस्य नानाभाऊ महाजन यांनीही निवेदनावर स्वाक्षरी केली़ मंगळवारी लालचंद पाटील, पल्लवी सावकारे, कैलास परदेशी, रवींद्र पाटील, मीना पाटील आदींची उपस्थिती होती़ दरम्यान, प्रशासकीय बाबींवरील आक्षेपांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले़
तारीखच नसल्याचा आरोप
या सदस्यांनी मुख्य लेखा व वित्तअधिकारी विनोद गायकवाड यांच्याकडील तांत्रिक मान्यतेच्या फाईली तपासल्या यातील २५ ते ३० फाईलींवर तारीखच नसल्याचे समोर आल्यानंतर आम्ही ते अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले़ त्यांनी त्रृटी सांगून बांधकाम विभागाला पुन्हा फाईली सादर करण्याचे सांगितल्याचे या सदस्यांनी सांगितले़ या घोळामुळे काही मोठे अधिकारी घरी जातील, असा दावाही या सदस्यांनी केला आहे़
---------------------------------
सर्वांना निधी दिला : अध्यक्षा पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्व ६७ सदस्यांना कमी जास्त प्रमाणात निधी दिला असून निधीवरून नाराज सदस्यांनी केलेले सर्व आरोप अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी फेटाळून लावले आहेत़ निधीच्या मुद्दयावरून आजपर्यंत एकही सदस्य आपल्यापर्यंत आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे़ निधीच्या मुद्दयावरून सुरू असलेल्या आरोपांबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले़
जिल्हा नियोजनकडील सर्व शंभर टक्के निधीचे एकत्रित नियोजन केलेले होे़ते़ ज्या कामांवरून वादळ उठविले जात आहे, मुळात त्या कामांच्या प्र.मा या अध्यक्षांना कामे वाटपाचे अधिकार मिळण्याच्या आधीच्या आहेत़ जे सदस्य आवाज उठवत आहे, त्यांना अतिरिक्त निधी दिलेला आहे़ सत्ताधारी सदस्यांना प्रत्येकी ५० लाख तर विरोधी सदस्यांना तीस लाख असा निधी दिल्याचे अध्यक्षा पाटील यांनी सांगितले़
जनसुविधा ५ कोटी ७० लाख , नागरि सुविधा २ कोटी ७५ लाख, अंगणवाडी २ कोटी, शाळा दुरूस्ती ४ कोटी ८५ लाख, तिर्थक्षेत्र ५ कोटी ७० लाख, अंगणवाडी बांधकाम ८ कोटी, प्रा़ आ़ केंद्र दुरूस्ती एक कोटी असे नियोजन असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली़ कामाची निवड व लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा यात समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ शिवाय प्रशासकी मान्यता, कार्यारंभ आदेश अधिकृत असल्याचे म्हटले आहे़ अधिकाºयांना कामे थांबविता येणार नाहीत, थांबविली असली तरी आम्ही अधिकाºयांना देऊ, असे अध्यक्षांनी सांगितले़