संतप्त विद्याथ्र्यानी बसेस रोखल्या
By admin | Published: January 30, 2017 11:58 PM2017-01-30T23:58:50+5:302017-01-30T23:58:50+5:30
चहार्डी : बसेस वेळेवर येत नाही, चालक-वाहक अरेरावी करतात असा आरोप
चोपडा : बसेस वेळेवर येत नाहीत, चालक-वाहक अरेरावी करतात म्हणून चहार्डी येथील संतप्त विद्याथ्र्यानी आज सकाळी सहा ते साडेनऊ वाजेर्पयत बसेस झाडवण चौकात रोखून धरल्या. अखेर चोपडा आगाराचे कर्मचारी चहार्डीत दाखल झाल्यानंतर त्यांनी विद्याथ्र्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर हा तिढा सुटला.
चोपडा आगारातील बसचालक व वाहक विद्याथ्र्याशी नेहमीच अरेरावीने बोलतात अशी तक्रार आहे.
त्यामुळे संतापलेल्या सर्व विद्याथ्र्यानी आज सकाळी सहा वाजेपासून भाडरू, विचखेडामार्गे येणा:या दोन बसेस चहार्डीत अडवून धरल्या. चहार्डीतील विद्याथ्र्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून आगारप्रमुखांनी चहार्डीला यावे असा आग्रह धरला. त्यात जवळपास तीन तास गेले. अखेर चोपडा आगारातील वरिष्ठ लिपिक डी.डी.चावरे हे चहार्डीत आले. त्यांना संतप्त विद्याथ्र्यानी घेराव घातला. चहार्डीसाठी स्वतंत्र बसेस सोडायच्या असतील तरच अडविलेल्या बसेसचा मार्ग मोकळा करू, अन्यथा एकही बस जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर चावरे यांनी संतप्त विद्याथ्र्याची समजूत काढली. सर्व परिस्थिती आगारप्रमुखांना सांगून काही तरी मार्ग काढला जाईल, असे आश्वासन दिले. तीन तासानंतर तिढा सुटला.
सकाळी नऊ वाजेनंतर त्या मार्गावरील सर्व बसेस सुरळीत धावू लागल्या. या वेळी विद्याथ्र्यानी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
चहार्डी येथून जवळपास 1000 ते 1200 विद्यार्थी चोपडा येथे शिक्षणासाठी जातात. चोपडा आगरातून चहार्डीसाठी स्वतंत्र बस सोडली जात नाही.
4 चहार्डीमार्गे भाडरू व विचखेडा जाणा:या बसेसमधूनच या विद्याथ्र्याना प्रवास करावा लागतो. तसेच या बसेसला त्या गावांमधूनच गर्दी असते. बसमध्ये जागाच नसल्याने चहाडीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना या बसेस सोडून द्याव्या लागतात. त्यामुळे महाविद्यालयात त्यांना पोहचण्यास उशीर होतो.
विद्याथ्र्याशी अरेरावी करणारे आणि चहार्डीत बस न थांबविणा:या चालक व वाहक यांची नावे संबंधितांकडून मागविली आहेत. अशा चालक व वाहकांना नोटीस देऊन कारवाई केली जाईल. प्रवाशांना उत्तम बससेवा देण्याचा प्रय} करणार आहे.
-नीलेश गावीत,
आगार प्रमुख, चोपडा