संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:15 AM2018-05-24T00:15:45+5:302018-05-24T00:15:45+5:30

वडगाव आंबे : ग्रामपंचायतीने ठराव करून पोलिसांना निवेदन दिल्यानंतरही अवैध धंदे बंद होईना

Angry women staged at the Gram Panchayat office | संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या

संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या

Next
ठळक मुद्देपिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांनी दोन दिवसात सर्व अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन मोबाइलवरून दिले. त्यानंतर महिलांनी दोन दिवसात अवैधधंदे बंद न झाल्यास जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे स्पष्ट केमहिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला व जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर सरपंच कलाबाई हरिभाऊ पाटील, उपसरपंच मंगेश गायकवाड, सदस्य हर्षल पाटील, मुकेश पाटील, सुनील निकम, ग्रामसेवक किशोर खोडवेग्रामसभेने ठराव करून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक, जळगाव, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगाव यांना वेळोवेळी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने महिलांना हे पाऊल उचलावे लागले असून, अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सरपंच कलाबाई हरि


आॅनलाईन लोकमत
पाचोरा, जि.जळगाव, दि. २३ : तालुक्यातील वडगाव आंबे येथे राजरोसपणे सुरू असलेले दारू, सट्टा, पत्ता असे अवैध धंदे तातडीने बंद करण्यात यावे या मागणीसाठी संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून हल्लाबोल केला.
वडगाव आंबे ग्राम पंचायतीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामसभेत संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे व ठारावाची प्रत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फेब्रुवारी महिन्यातच कारवाई करण्यासाठी देण्यात आली आहे. परंतु कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीने एप्रिलमध्ये जळगाव येथे पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्र देऊन कारवाई करण्यासाठी विनंती केली. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. ग्रामसभेने अवैध धंदे बंद करण्याचा ठराव करून व संबंधितांना लेखी देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या महिलांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्याची व व्यसनाधिनतेने अनेक संसार उद्ध्वस्त होण्याची वाट पाहू नये अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त महिलांनी यावेळी दिला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच, उपसरपंच, सदस्य आले. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. गावात महिला पोलीस पाटील रेखा वाघ असल्यावरही त्या न येता त्यांच्याऐवजी त्यांचे पती आल्याने महिलावर्गाने नाराजी व्यक्त केली. या ठिय्या आंदोलनात रंजनाबाई पाटील, शांताबाई सूर्यवंशी, गीताबाई पाटील, सिंधूबाई हडप, केदाबाई हटकर, सुरेखा जैन, सुनबाई मराठे यांच्यासह अनेक महिला व पुरुष सहभागी झाले. या वेळी उपसरपंच अ‍ॅड.मगेश गायकवाड, पीतांबर सपकाळे व महिलांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला.



 

Web Title: Angry women staged at the Gram Panchayat office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.