जळगाव पीपल्स बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:32+5:302021-05-01T04:15:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव पीपल्स बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव पीपल्स बँकेच्या नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या सभेत बँकेच्या चेअरमनपदी अनिकेत पाटील व व्हाइस चेअरमनपदी डॉ. प्रकाश कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
जळगाव पीपल्स बँकेचे संचालक मंडळ सदस्यांची निवडणूक प्रक्रिया गेल्या आठवड्यात पार पडली होती. सर्व निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध पार पडली असून, शुक्रवारी चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाचीदेखील निवडप्रक्रिया पार पडली आहे. चेअरमनपदी निवड झालेले अनिकेत पाटील हे बँकेचे माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत. बँकेचा आजवरच्या इतिहासातील सर्वात कमी वयात चेअरमनपदी विराजमान झालेले अनिकेत पाटील पहिलेच संचालक ठरले आहेत, तर व्हाइस चेअरमनपदी निवड झालेले डॉ. प्रकाश कोठारी हे चार्टर्ड अकाउण्टण्ट आहेत. नवनिर्वाचित चेअरमन व संचालक मंडळाचा बँकेतर्फे व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. माजी चेअरमन भालचंद्र पाटील यांनी सलग १५ वर्षे सर्वाधिक काळ बॅंकेचे चेअरमनपद भूषवले आहे. मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी कायद्यानुसार दोन कालावधीपेक्षा जास्त कार्यकाळ चेअरमनपदी राहू शकत नसल्याने बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचे नेतृत्व सर्वानुमते अनिकेत पाटील यांच्याकडे सोपविले आहे.