अनिल नारखेडे यांची सीबीआयकडून चौकशी

By Admin | Published: March 30, 2017 12:12 PM2017-03-30T12:12:28+5:302017-03-30T12:12:28+5:30

सीबीआयने मुंबईत सुभाष चौक अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीच्या नवी पेठ शाखेतील व्यवस्थापक अनिल नारखेडे यांची चौकशी केली.

Anil Narkhede is questioned by the CBI | अनिल नारखेडे यांची सीबीआयकडून चौकशी

अनिल नारखेडे यांची सीबीआयकडून चौकशी

googlenewsNext

 नंदकुमार पवार व भूषण तायडे यांच्या लॉकरची घेतली माहिती : पथक पुन्हा जळगावात धडकण्याची शक्यता

जळगाव,दि.30- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोपडा येथील शाखेत 73 लाख 32 हजारांच्या नोटा बदलल्याच्या प्रकरणात सीबीआयने मुंबईत सुभाष चौक अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटीच्या नवी पेठ शाखेतील व्यवस्थापक अनिल नारखेडे यांची चौकशी केली. 
नारखेडे यांना जि.प.तील शाखा अभियंता नंदकुमार पवार व जि.प.च्या बांधकाम विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक भूषण तायडे यांच्या लॉकरची सविस्तर माहिती, काही कागदपत्र घेऊन मुंबई येथे येण्याचे सीबीआयच्या चौकशी पथकाने मागील रविवारी बजावले होते. त्यानुसार नारखेडे हे मंगळवारी रात्रीच मुंबई येथे निघाले. 
लॉकरमधील कादपत्र घेतले ताब्यात
सीबीआयच्या पथकाने नंदकुमार पवार व तायडे यांच्या सुभाष चौक अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटीमधील लॉकरमध्ये ठेवलेले काही कागदपत्र नारखेडे यांच्याकडून ताब्यात घेतले आहेत. तसेच या लॉकरमध्ये काय ठेवले गेले, त्यासंबंधीच्या नोंदणी पुस्तकातील सविस्तर माहितीही पथकाने जाणून घेतली. 
किती दिवसांपासून लॉकर उघडले?
सुभाष चौक अर्बन को.ऑप. क्रेडीट सोसायटीमधील लॉकर मागील किती दिवसांपासून कार्यरत आहे. त्याची हाताळणी किती वेळेस झाली? ही हाताळणी करण्यासाठी इतरांना कुणाला परवानगी कधी मिळाली होती का? या सोसायटीमधील अधिका:यांशी किंवा इतरांशी पवार व तायडे यांचे संबंध कसे आहेत असे अनेक प्रश्न नारखेडे यांना विचारण्यात आले. 
नारखेडे यांचा मोबाईल स्वीच ऑफ
चौकशीदरम्यान नारखेडे यांचा मोबाईल स्वीच ऑफ होता. नारखेडे यांनी बुधवारी  कुणाशीही संपर्क केला नाही. पतसंस्थेच्या काही संचालकांनी नारखेडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 
इतर दोघांच्या चौकशीचीही चर्चा
सीबीआयच्या पथकाने बुधवारी सायंकाळर्पयत मुंबई येथे जिल्हा बँँकेशी संबंधीत एक व्यक्ती व याच प्रकरणात चौकशी झालेल्या एका अधिका:याचीदेखील चौकशी केल्याची चर्चा होती. पण नेमकी कुणाची चौकशी झाली हे  समजू शकले नाही. 
नारखेडे यांची इन कॅमेरा चौकशी
सीबीआयच्या चौकशी अधिका:यांनी नारखेडे यांचे जबाब नोंदवून घेतले. इन कॅमेरा ही चौकशी झाली. नोदाबदली प्रकरणात चौकशी करीत असलेल्या पथकातील चौघांनी यासंदर्भातील कार्यवाही मुंबई येथे पार पाडली. नारखेडे यांनी चौकशी पथक किंवा अधिकारी यांना काय जबाब दिला, कुणाची नावे सांगितली हे मात्र कळू शकले नाही. 

Web Title: Anil Narkhede is questioned by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.