अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:55 PM2019-12-17T17:55:13+5:302019-12-17T17:56:32+5:30

अमळनेर येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती. आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे.

With Anil Patil in power, people hope to get funding to complete irrigation projects in Amalner taluka. | अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

अनिल पाटील सत्ताधारी झाल्याने अमळनेर तालुक्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळण्याची जनतेला आशा

googlenewsNext

डिगंबर महाले
अमळनेर, जि.जळगाव : येथील अनेक छोटे-मोठे जलसिंचन प्रकल्प निधीअभावी अपूर्ण आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ही बाबही अधोरेखित झाली होती.आमदार अनिल पाटील आता राज्यात सत्ताधारी झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी भरीव निधी खेचून आणावा, ही जनतेची रास्त अपेक्षा आहे. अर्थात आमदार पाटील यांनी पांझरा माळन नदीजोड प्रकल्पाबाबत बैठक घेऊन त्यांच्या कामाची दिशात्मक चुणूक दाखवली आहे. त्यामुळे जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प
१) निम्न तापी पाडळसरे प्रकल्प
१९९८ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाचा प्रवास संघर्षमय आहे. युती सरकारच्या काळात याची सुरुवात झाली आहे. यास २०११ ला जलआयोगाची तत्वत: मान्यता मिळाली आहे. २०१३ला पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र त्रुटी निघाल्याने २०१४ मध्ये त्रुटींची पूर्तता करण्यात आली. २०१८ मध्ये टीएसी कमिटीची मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी सर्वाधिक निधी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आणला. त्यांनी सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सातत्याने दमदार पाठपुरावा केला. पाडळसरे प्रकल्पासाठी गुंतवणूक समितीची (आयसीसी) मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार त्यासाठीचा प्रस्तावही अद्याप सादर होणे बाकी आहे.
२) नादुरुस्त व अपूर्ण उपसा सिंचन योजना
पाडळसरे धरणातील पाणी साठ्याच्या वापरापासून परिसरातील शेतकरी वंचित आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्यातील अपूर्ण उपसा सिंचन योजना. बोहरा येथील साने गुरुजी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित असती तर मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली आली असती. तत्कालीन आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ह्या योजनेचे थकीत वीजबिल टंचाई निधीतून माफ करून आणले होते. तसेच संस्थेवर बसलेले प्रशासकही हटविले होते. त्यांच्यानंतर मात्र या विषयास फारशी चालना मिळाली नाही. कृषिभूषण पाटील यांच्या काळात पाडळसरे धरणाचे जे काम झाले त्यामुळे या उपसा सिंचन योजनेच्या विहीरीजवळ मोठा व कायमस्वरूपी जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू होण्यास फक्त राजकीय इच्छाशक्तीची आणि निधीची गरज आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यास मारवड परिसरातील अनेक हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. परिसरातील गावांच्या पिण्याचा पाण्याचीही समस्याही सुटेल.
३) माळण पांझरा नदीजोड प्रकल्प
तालुक्यातील पश्चिम भागातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी माळन पांझरा नदीजोड प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी तालुक्यातील रणाईचे, खडके, निसर्डी, वाघोदे, चिमनपुरी, पिंपळे, ढेकु, गलवाडे या गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक तसेच मारवड विकास मंच, रणाईचे विकास मंच यांनी गावोगावी बैठका घेतल्या. शासनालाही जागे करण्याचा प्रयत्न केला. विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे प्रयत्न करून सर्वेक्षणासाठी २० लक्ष रुपये मंजूर करून आले होते. त्यामुळे सर्वेक्षणही झाले. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला अद्यापही त्याबाबतचे बिल मिळाले नसल्याचे समजते. अनिल पाटील यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवातच या प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन केली. त्यातून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची त्यांची मानसिकता सकारात्मक असल्याचे दिसते.
४) धार मालपूर पाझर तलावासाठी जीवनदायी ठरणारा वळण बंधारा
पुराचे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी वळण बंधाºयाच्या माध्यमातून धार मालपूर बंधाºयात टाकण्यात येईल. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहीरींना लाभ मिळेल. तसेच अनेक गावांचा पिण्याचा प्रश्न सुटेल. हा प्रकल्प ११ गावांच्या शेती सिंचनासाठी खूपच उपयुक्त आहे.
५) सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प सुरू ठेवणे
तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना वीज पुरवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सोलर प्रकल्प उभारून सिंचन योजना सुरू करण्यात अशी अनेकांची दीर्घकालीन अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनिल पाटील यांनी या सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सतत पाठपुरावा करणे. त्यासाठी भरीव निधी आणावा, ही जनतेची आग्रही अपेक्षा आहे.

Web Title: With Anil Patil in power, people hope to get funding to complete irrigation projects in Amalner taluka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.