आव्हाणे भागात प्राण्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:21 PM2019-05-07T12:21:49+5:302019-05-07T12:25:29+5:30

नागरिकांमध्ये भिती

Animal communication in the crystalline areas | आव्हाणे भागात प्राण्याचा संचार

आव्हाणे भागात प्राण्याचा संचार

Next

जळगाव : शहरातील खोटे नगर परिसरातील वाटीकाश्रम भागात तीन दिवसांपासून बिबट्यासद्दश्य हिंस्त्र प्राण्याचा संचार वाढला असून, अनेक नागरिकांना या प्राण्याचे दर्शन देखील झाले आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास आव्हाणे, निमखेडी शिवारात काही वाळू व्यावसायिक व शेतकऱ्यांना बिबट्यासद्दश्य प्राण्याचे दर्शन झाल्यामुळे पून्हा खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पगमार्कची तपासणी केली असता तो कुत्रा वर्गीय प्राणी, रानमांजर अथवा तडस असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वन अधिकारी व वन्यजीव संरक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. रविवारी या भागात बिबट्याचे पग मार्क देखील आढळून आले. दरम्यान, वाटीकाश्रम व गौरव पार्क भागात ट्रॅप कॅमेरे देखील लावले आहेत. मात्र या कॅमेºयात बिबट्याचे दर्शन झाले नसल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
वन्यजीव संस्थेच्या सदस्यांकडून पाहणी
रविवारी वन्यजीव संरक्षण संस्थेचे वासुदेव वाढे व पथकाने माहिती मिळाल्यावर गौरव पार्क भागात पाहणी केली. यावेळी वन्यप्राण्याचे पायाचे ठसे आढळून आल्याचे वाढे यांनी सांगितले. मात्र ठसे अस्पष्ट असल्याने ते बिबट्याचेच आहे असे ठोस सांगता येत नसल्याचे ते म्हणाले.
पगमार्कची केली पाहणी
या पथकाने गौरव पार्क भागातील नागरिकांच्या भेटी घेतली असता नागरिक वन्यप्राणी पाहिल्याचे सांगत होते त्यांच्याकडून पथकाने प्राण्याचे वर्णन जाणून घेतले. नागरिकांनी दिलेली माहिती तसेच पगमार्कची पाहणी केली.त्यावरुन तो प्राणी बिबट्या नसल्याचे लक्षात आले. कुत्रावर्गीय प्राणी असावा असा कयास आहे.
वन्यप्राण्याबाबत संभ्रम...
जळगाव वनक्षेत्रांतर्गत शहरातील खोटे नगर परिसरात बिबट्यासद्दश्य प्राणी दिसल्याने नागरिक भयभित झाले होते. हा प्राणी नेमका कोणता याबाबत नागरिकांच्या मनात अद्यापही संभ्रम आहे. शहरालगत खोटे नगर परिसरातील वाटीका आश्रम जवळील गौरव पार्क भागात गेल्या ४ रोजी दुपारी ३.३० वाजता बिबट्यासद्दश्य प्राणी दिसल्याचे अनिल शिवाजी भोसले या नागरिकाने वन विभागाला कळविले होते. ही माहिती मिळाल्यानंतर उपवनसंरक्षक डी. डब्ल्यू. पगार यांनी काही वन अधिकारी तसेच वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांना परिसरात पाठविले होते.

Web Title: Animal communication in the crystalline areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव