पशु खाद्य महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:12+5:302021-04-17T04:15:12+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पशुखाद्याचे दर वधारले आहेत. जिल्ह्यात सध्या सरकी ढेपचे पोते दोन हजार ते २१०० ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पशुखाद्याचे दर वधारले आहेत. जिल्ह्यात सध्या सरकी ढेपचे पोते दोन हजार ते २१०० रुपये दराने मिळत होते. काही महिन्यांपुर्वी याच सरकी ढेपचे दर १५०० च्या आत होते. या मुळे पशुपालक अडचणीत आले आहेत.
वाटचालचे ऑनलाईन प्रकाशन
जळगाव : वाटचाल आधुनिक शारिरीक शिक्षणाची या डिजीटल नियतकालिकाचे प्रकाशन नुकतेच शिक्षक आमदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक , नाशिक विभागाचे पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ . सुधीर तांबे , मुंबई विभागाचे आमदार कपिल पाटील ,पुणे विभागाचे आमदार जयंत आसगावकर , राजेंद्र कोतकर , या नियतकालिकेचे संपादक राजेश जाधव व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .