गुरे चोरीच्या घटनांनी पशुपालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 09:43 PM2019-12-01T21:43:51+5:302019-12-01T21:44:38+5:30

सामनेर,ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या माहिजी येथे २९ रोजी मध्यरात्री गावातील दोन म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली. यापूर्वी देखील ...

Animal Husbandry Plagued by Cattle Theft | गुरे चोरीच्या घटनांनी पशुपालक त्रस्त

गुरे चोरीच्या घटनांनी पशुपालक त्रस्त

Next



सामनेर,ता.पाचोरा : येथून जवळच असलेल्या माहिजी येथे २९ रोजी मध्यरात्री गावातील दोन म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली. यापूर्वी देखील गुरे चोरीच्या घटना घडल्या आहेत.
या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीला गेलेल्या गुरांचा तपास लागत नसल्याचा अनुभव पशुपालकांना येत आहे. याबाबतीत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पशुपालक करीत आहेत. माहिजी गावातील शेतकरी बापू धनराज पाटील व डॉ.विशाल पाटील यांनी आपल्या गावाशेजारील खळ््यात आपली गुरे बांधलेली होती. सकाळी खळ््यात गेल्यावर आपल्या गुरांमध्ये प्रत्येकी एक म्हेस चोरीला गेल्याचे निर्दशानास आले. या म्हशींची बाजारभाव किंमत साधारण प्रत्येकी ५० ते ६० हजार आहे.
याबाबत पाचोरा पोलीसात कळविले असून, पुढील तपास सुरू आहे. रात्रीच्या वेळी माहिजी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सर्रासपणे सुरू आहे. एवढी वाहनांची वर्दळ असताना गुरांची चोरी कशी होते ? असा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.

 

Web Title: Animal Husbandry Plagued by Cattle Theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.