पशु सेवा हीच ईश्वर सेवा, हे जीवनध्येयच त्यांचे झाले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:00 PM2020-08-10T22:00:02+5:302020-08-10T22:41:41+5:30
पशु अॅनिमल प्रोटेक्टशन असोसिएशन : १५ प्राण्यांना जीवनदान देवून दाखविली भूतदया
जळगाव : अपघातग्रस्त मनुष्यासाठी सारेच जण धावत असतात, पण विविध अपघात, नैसर्गिक आपत्ती यात जखमी होणाऱ्या पशू, पक्षी आणि प्राण्यांचे काय? त्यांच्या मदतीला कोणी पुढे येत नाही. जळगाव शहरातील पशु अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशन ही विद्यार्थ्यांची संस्था याला अपवाद ठरते आहे़ मागील वर्षापासून ‘पशु अॅनिमल प्रोटेक्शन’ या संस्थेच्या सेवाभावी कार्यामुळे असंख्य प्राण्यांना अभय मिळाले आहे़ जखमी प्राण्यांची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या योग्य उपचार करून त्यांची देखभाल ही संस्था करीत असल्याने पशु सेवा हिच ईश्वर सेवा, हे जीवनध्येयच त्यांचे झाले आहे़
प्राण्यांची प्रचंड आवड असलेल्या शहरातील विद्यार्थ्यांनी काही वर्षांपासून ‘पशु अॅनिमल प्रोटेक्टशन असोसिएशन’ नामक संस्था स्थापन केली आहे़ गेल्या काही वर्षांपासून ही संस्था मोकाटा प्राण्यांच्या मदतीला धावून जात आहे़ त्यामुळे ही संस्था प्राण्यांचा आधार ठरली आहे़ लॉकडाऊन काळात मोकाट प्राण्यांना अन्न मिळत नसल्यामुळे या संस्थेतील विद्यार्थी त्या प्राण्यांच्या मदतीला सरसावले होते़ दिवसात शंभर ते दीडशे मोकाट कुत्र्यांना अन्न उपलब्ध करून देण्यात आले होते़ नुकतेच जमखी प्राण्यांची जबाबदारीही या संस्थेतील विद्यार्थ्यांनी उचलली आहे़ अपघातात जखमी झालेले व अत्यावस्थ अवस्थेत असलेले पशु, पक्षींवर या संस्थेतर्फे मोफत उपचार केले जात आहेत़
१५० प्राण्यांना मिळाले जीवनदान
महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवर जखमी झालेले मोकाट कुत्रे, गायी तसेच इतर प्राण्यांबाबत माहिती मिळताच ही संस्था त्याठिकाणी जावून प्राण्यांवर उपचार करते़ तसेच उपचार केंद्रही स्थापन केले असून गंभीर जखमी असलेल्या प्राण्यांना केंद्रात नेवून त्यांच्यावर उपचार केले जाते़ वर्षभरात सुमारे दीडशे प्राण्यांना या संस्थेने जीवदान दिले आहे़
रूग्णवाहिकाही लवकरच उपलब्ध
तात्काळ जखमी व अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या मुक्या प्राण्यांना उपचार मिळावे यासाठी रूग्णवाहिका सुविधाही संस्थेच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ हे सेवाकार्य संस्थाध्यक्ष खुशबू श्रीश्रीमाळ, कोमळ श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, डॉ़ पंकज राजपूत, हर्षल भाटीया, अभिषेक जैन, राहुल थोरानी, राहुल कटपाल, भूमिका मंत्री, दिपांक्षू दोषी, नॅन्सी कटपाल, तेजू आर्या, रकक्षंदा परदेशी आदी करीत आहेत़ विशेष म्हणजे, मोकाट कुत्र्यांवर उपचार केल्यानंतर त्याची योग्यदेखभाल करणाºया मालकाचा ही संस्था शोध घेते व नंतर त्या कुत्र्याला संबंधित मालकाला सोपविले जाते़