सुप्रिम कॉलनीत सापडली जनावरांची कातडी; एमआयडीसी पोलिसांसह मनपाची कारवाई 

By सागर दुबे | Published: April 8, 2023 05:05 PM2023-04-08T17:05:36+5:302023-04-08T17:05:42+5:30

सु्प्रिम कॉलनीमधील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये जनावरांची कातडींची साठवणूक करून ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती.

Animal skin found in Supreme Colony; Municipal action with MIDC police | सुप्रिम कॉलनीत सापडली जनावरांची कातडी; एमआयडीसी पोलिसांसह मनपाची कारवाई 

सुप्रिम कॉलनीत सापडली जनावरांची कातडी; एमआयडीसी पोलिसांसह मनपाची कारवाई 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुप्रिम कॉलनी येथील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये शनिवारी दुपारी जनावरांची कातडी एमआयडीसी पोलिसांसह मनपाच्या पथकाला आढळून आली. या गोडावूनवर कारवाई करीत कातडी जप्त करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कातडीचे नमूने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

सु्प्रिम कॉलनीमधील ममता बेकरीजवळील एका गोडावूनमध्ये जनावरांची कातडींची साठवणूक करून ठेवण्यात आली असल्याची माहिती एका व्यक्तीकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या डायल ११२ क्रमांकावर देण्यात आली. पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन तातडीने या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी कार्यवाही सुरू केली. याची माहिती मनपाच्या मटन मार्केट विभागाला सुध्दा कळविण्यात आली. त्यानुसार मनपाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या व मनपाच्या पथकाने गोडावूनमध्ये जावून पाहणी केल्यानंतर त्यांना सुमारे ११०० ते १२०० नगर जनावरांची कातडी त्याठिकाणी आढळून आली.

जेसीबी बोलवून गोडावून तोडले...
पोलिसांसह मनपाच्या पथकाने कारवाई करून जेसीबी बोलवून गोडावूनचा काही भाग तोडून कातडी बाहेर काढून जप्त केली. याठिकाणी डॉक्टरांना बोलवून चाचणीसाठी कातडींचे नमूने घेण्यात आले. तसेच जप्त केलेली जनावरांची कातडी ही जमिनीत पुरविण्यात येणार असल्याचे मनपाच्या पथकाने सांगितले. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, दीपक जगदाळे, विकास सातदिवे, पंकज पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे यांच्यासह मनपाच्या पथकातील आरोग्य अधीक्षक जितेंद्र किरंगे, आरोग्य निरीक्षक विशाल वानखेडे, अधीक्षक संजय ठाकूर, किशोर सोनवणे  आदी कर्मचा-यांनी केली. याप्रकरणी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Animal skin found in Supreme Colony; Municipal action with MIDC police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.