अंजली दमानिया यांना जामनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:25 PM2019-04-17T15:25:00+5:302019-04-17T15:26:00+5:30
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
जामनेर, जि.जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
भाजपचे शेंदुर्णी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा उपाध्यक्ष उत्तम राघो थोरात यांनी, खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध १६ आॅगस्ट २०१६ रोजी फौजदारी खटला क्रमांक ४६०/२०१६ येथील न्यायालयात दाखल केला होता.
न्यायालयाने चौकशी करुन कागदपत्रांची तपासणी केली व युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे मंगळवारी प्रोसेस इश्यू जारी केले. थोरात यांच्याकडून अॅड.प्रदीप शुक्ला काम पाहत असून, त्यांना जळगाव येथील अॅड. व्ही.एच.पाटील मदत करीत आहे.