अंजनी धरणाने गाठली ‘पंचाहत्तरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:05 PM2020-08-24T22:05:52+5:302020-08-24T22:06:01+5:30
पूर्ण भरण्याची आशा : जलसाठा चांगला झाल्याने परिसरात समाधान
एरंडोल : तालुक्याच्या दृष्टीने सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले येथील अंजनी धरण ७४.८३ टक्के पाण्याने भरले आहे. एकूण जलसाठा ४१५ द.ल.घ.फु. आहे. धरणातील पाणीसाठ्याची उंची १० ते १५ मिटर असून पाणी साठ्या ाचा तलांक २२५.२८ मिटर आहे. अंजनी धरणाने यंदाच्या पावसाळ्यात जवळपास पंच्याहत्तरी गाठली असून शतकीय वाटचाल सुरू केली आहे.
धरणातील मुबलक पाणीसाठयामुळे एरंडोल शहर व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे तसेच चार सिंचन आवर्तने सुटण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे जवळपास एक हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे.
पूर्ण क्षेत्राला लाभ नाही
अंजनी धरणाची कालवा प्रणाली अजूनही अपूर्ण असल्यामुळे धरण भरूनही जवळपास १३ वषार्पासून सिंचनाचा लाभ पूर्ण क्षमतेने होत नाही.
करोडो रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे मात्र एक दशकापेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा धरणाच्या कार्यक्षेत्रात शेतापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. याबाबत खंत व्यक्त केली जात आहे. वितरिका, उपवितरीका व शेती चाऱ्या यांची कामे झाली नाहीत. परिणामी ‘अंजनी’च्या संपूर्ण क्षेत्रात सिंचनाचा लाभ देता येत नाही.
सिंचनचा अत्पल्प
प्रमाणात लाभ
कालवा प्रणालीची शेपटी लांबल्यामुळे धरणाचे कार्यक्षेत्र सुजलाम सुफलाम होईल हे स्वप्न अजूनही साकार झाले नाही. केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प म्हणून व अत्यअल्प प्रमाणात सिंचनाचा लाभ देणारा प्रकल्प म्हणून या धरणाची ओळख झाली आहे.