‘अण्णा’ अटकेत
By admin | Published: February 17, 2017 01:06 AM2017-02-17T01:06:04+5:302017-02-17T01:06:04+5:30
सामूहिक आत्महत्या प्रकरण : दोन आरोपी फरार
नरडाणा : एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी म्हळसर येथील भिला चंद्रा भिल ऊर्फ अण्णाला नरडाणा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. घर सोडून जाण्याची देण्यात आलेली धमकी हे सामूहिक आत्महत्येमागचे कारण असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
11 फेब्रुवारी रोजी रात्री आसाराम बभुता भिल (वय 42), शिवदास पिंटू भिल (वय 21), मोठाभाऊ पिंटू भिल (वय 18 ) या तीन जणांनी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. तर आसारामची प}ी विठाबाई (वय 39)चा मृतदेह विहिरीत आढळला. शेजारीच त्यांची 16 वर्षीय मुलगी अक्काबाई ऊर्फ वैशाली ही जखमी अवस्थेत आढळून आली. वैशाली हिच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार म्हळसर येथे त्यांच्या घरासमोर राहणा:या अण्णा उर्फ भिला चंद्रा भिल व त्याच्या अन्य दोन सहका:यांनी वडील आसाराम भिल यांना घर सोडून देण्याविषयी धमकी दिली होती. त्यातूनच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. नरडाणा पोलिसांनी भिला भिल व दोन सहका:यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. भिला यास गुरुवारी म्हळसर गावातून अटक केली. त्याला 20 र्पयत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.