चाळीसगाव विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:13+5:302021-09-02T04:34:13+5:30
यावेळी व्यासपीठावर किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, मास्टर लाईनचे संचालक समीर जैन, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर, ...
यावेळी व्यासपीठावर किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, मास्टर लाईनचे संचालक समीर जैन, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, लोकमतचे कार्यकारी संपादक रवीजी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी उपस्थित होते.
‘लोकमत’ने सर्व क्षेत्रातील लोकांना व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या गरजा व भावना ओळखून केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. ‘लोकमत’ने सडेतोड लिखाण करून समाजात एक विशिष्ट अशी प्रतिमा निर्माण केली आहे. सामान्य जनतेची भावना समजून ती वेगळ्या शैलीत दिल्यामुळे सर्व घटकातील वाचकांचा लोकमत खऱ्या अर्थाने मानबिंदू ठरला आहे.त्यामुळे लोकमत लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्याचबरोबर लोकमतने विश्वासार्हता मिळविल्याने लोकमत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. असा सूर उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केला.
‘लोकमत’चे कार्यकारी संपादक रवीजी टाले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लोकमत’मध्ये आमूलाग्र बदल करून रंगरूप बदलले आहेत. शिवाय अनेक नवे स्तंभ, नवनवीन विषय हाताळून जनतेच्या आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. कोरोनाचा तडाखा वृत्तपत्राला मोठा बसला आहे. अशा कठीण कालखंडात ‘लोकमत’ने समर्थपणे तोंड दिले. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. यापुढेही असेच कार्य सुरू राहील.
सूत्रसंचालन जिजाबराव वाघ यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत रवींद्र वरखेडे, संजय सोनार, श्रीकांत भामरे, दिलीप सोनवणे, शामकांत सराफ, अशोक परदेशी यांनी केले.
कार्यक्रमात माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी,अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे,पोलीस निरीक्षक के. के. पाटील, मिनाक्षी निकम, पालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, उध्दवराव महाजन, किसनराव जोर्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम देशमुख, नगरसेवक दिपक पाटील,विश्वास चव्हाण, योगेश अग्रवाल, रामचंद्र जाधव, प्रतिभा चव्हाण, किशोर पाटील,रवींद्र जाधव,प्रा.संजय घोडेस्वार, अमोल घोडेस्वार, राकेश बोरसे, कमलाकर सामंत, भिकनराव गायकवाड, खुशाल पाटील,रमेश चौधरी, एम. बी. पाटील, देविदास पाटील, रामलाल चौधरी यांचेसह विविध क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते.