पहूरच्या लेले विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:00+5:302021-08-25T04:21:00+5:30
पहूर, ता. जामनेर: पहूरसह परिसरातील पंचवीस खेड्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगोत्री लेले विद्यालयाच्या रूपाने पहूर येथे ६३ वर्षांपूर्वी अवतरली. ...
पहूर, ता. जामनेर: पहूरसह परिसरातील पंचवीस खेड्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगोत्री लेले विद्यालयाच्या रूपाने पहूर येथे ६३ वर्षांपूर्वी अवतरली. अवघ्या दहा विद्यार्थ्यांच्या चावडीवरील आज शाळेने एक हजार विद्यार्थी संख्येचा टप्पा गाठल्याने लेले विद्यालय वटवृक्षात रूपांतरित झाल्याचे कार्य वर्धापन दिनाच्या निमित्ताने समोर आले.
पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित लेले विद्यालयाचा ६३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे प्रचारक हेमंत जोशी होते. यावेळी संस्थेच्या कार्याचे अहवाल वाचन मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी केले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, जि. प. सदस्य अमित देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख रामेश्वर पाटील, कसबेचे उपसरपंच राजू जाधव, प्रगतिशील शेतकरी अशोक पाटील, संचालक अँड एस. आर. पाटील, विकासो चेअरमन किरण खैरणार, तंटामुक्ती अध्यक्ष दौलत घोलप, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, माजी उपसरपंच योगेश भडांगे, धोबी समाज तालुका अध्यक्ष चेतन रोकडे, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित अतिथींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आर. टी. देशमुख व एन. ए. पाटील यांनी केले व आभार पर्यवेक्षक एस. व्ही. पाटील यांनी मानले.