स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:32+5:302021-01-13T04:38:32+5:30
जळके तांडा जि.प.शाळा जळकेतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...
जळके तांडा जि.प.शाळा
जळकेतांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी तेजस्विनी चव्हाण व गोपिका चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेतील शिक्षक सोमनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या, तसेच लेखन साहित्याचे वाटप सोमनाथ ब्रिजलाल पाटील यांनी केले.
०००००००००००००००००००००००
सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल
सु.ग.देवकर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका साधना महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रशांत साखरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. जितेंद्र वारखेडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रसंगांची माहिती सांगितली.
०००००००००००००००००००००००००
फोटो
सरस्वती विद्या मंदिर
सरस्वती विद्या मंदिर येथे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दीपाली देवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ग.स अध्यक्ष मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर उज्ज्वला ब्राह्मणकार यांनी मनोगत व्यक्त केले. कोमल पाटील या विद्यार्थिनीने जिजाऊंची वेशभूषा सादर करत भाषण केले. सूत्रसंचालन तन्वी पवार हिने केले.
००००००००००००००००००००००
फोटो
प.वि. पाटील विद्यालय
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयात मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते प्र्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर, विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती देण्यात आली.
०००००००००००००००००००००००
आरआर विद्यालय
आरआर विद्यालयात ज्येष्ठ शिक्षक बापुराव पानपाटील व प्रांजली रस्से यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले़ त्यानंतर डी.बी.पांढरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली़ सूत्रसंचालन व्ही.एम.ढाके यांनी केले, तर आभार एस.एन. चौधरी यांनी मानले. कार्यक्रमात के.पी.माळी, एस.एन. कोळी, मानसी बऱ्हाटे, द्वारकाधीश जोशी, टी.बी.पांढरे, डी.बी.साळुंखे, अक्षय सपकाळे आदींची उपस्थिती होती.
००००००००००००००००००००
अभिनव प्राथमिक विद्यालय
अभिनव प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक ललित नेमाडे यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले. अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा चौधरी, ज्योती इंगळे, वैशाली राठोड, संगीता महाजन, योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, शारदा धांडे, नीलिमा वारके, उमेश चौधरी, स्नेहल ठाकूर आदी उपस्थित होते.
०००००००००००००००००००००००
फोटो
जिजामाता माध्यमिक विद्यालय
न्यू जागृती मित्रमंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. क्रीडा शिक्षक किशोर पाटील, लता इखनकर, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, जगदीश शिंपी उपस्थित होते. सूत्रसंचलन संजय खैरनार तर आभार प्रदर्शन विकास तायडे यांनी केले.
००००००००००००००००००००००००
पुष्पावती गुळवे माध्यमिक विद्यालय
पुष्पावती गुळवे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका एच.आर.पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इयत्ता नववीची विद्यार्थिनी रोझ तडवी हिने स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
००००००००००००००००००००००
काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय
काशिबाई कोल्हे विद्यालयात उपमुख्याध्यापक ए.व्ही.ठोसर व पी.ए.पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी एस.जे.नारखेडे, एस.एम. खडके, जे.पी.नारखेडे, डी.एन.पाटील, आर.जी.काळे, के़एच़घुले, के. एस.जाधव आदी उपस्थित होते.
००००००००००००००००००००००
फोटो
प.न.लुंकड कन्या शाळा
प.न.लुंकड कन्या शाळेत मुख्याध्यापिका साधना भालेराव, पर्यवेक्षिका स्वाती नेवे यांनी कार्याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन जयश्री माळी यांनी केले, तर यशस्वितेसाठी शिक्षक शिवाजी सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
०००००००००००००००००००००
चांदसरकर प्राथमिक विद्यालय
गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्या मंदिरात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर यांनी सहकार्य केले.
-------------
आर.पी.आय (आठवले गट)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट महिला आघाडीतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिजीत पाटील व तालुकाध्यक्ष रमा ढिवरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रसंगी महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, सुलोचना माळी, हर्षाली सोनार, नीलिमा वरणकर, मीरा सोनवणे, संगीता पवार, मनीषा उमाळकर, तनुजा भोई, लता वाघ, मोनाली पवार, पूजा कोळी, सोनाली याहिदे, महेश उमाळकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
--------------
रत्ना जैन विद्यालय
रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत अभिवादन करण्यात आले.
------------
ज्ञानसाधना माध्यमिक विद्यालय
ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका छाया भोळे व राजश्री महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. वैजयंती भोळे, सुनंदा अत्तरदे, धराज भंगाळे, विक्रम महाजन, हिरालाल चौधरी, उदय नेमाडे उपस्थित होते.
---------------
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यालय
कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी व नीलेश नाईक उपस्थित होते. उपशिक्षक नरेंद्र वारके व स्वाती याज्ञीक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या निमित्त शाळेत ऑनलाइन वक्तृत्व, निबंध, चित्रकला व वेशभूषा स्पर्धा झाली. सूत्रसंचालन उज्ज्वला जाधव यांनी केले.
------------
प्रगती माध्यमिक शाळा
प्रगती माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका शोभा फेगडे व बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, तर प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी अभिवादन केले. नेहल चौधरी या विद्यार्थिनीने एक पात्री नाट्यछटा अभिनय सादर केला. शिक्षक दीपक बारी उपस्थित होते.
०००००००००००००००००००
समर्थ विद्यालय, आव्हाणे
श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, आव्हाणे शिवार शाळेत ऑनलाइन वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा झाली. मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी मार्गदर्शन तर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे यांनी स्पर्धांचे आयोजन केले.
पद्मालया इंग्लिश स्कूल शिरसोली
पद्मालया इंग्लिश स्कूलमध्ये प्राचार्या स्वाती चौधरी व संस्थेच्या अध्यक्षा भारती बारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक हेमंत नेमाडे, मनिष पाटील यांनी मार्गदर्शन केले.