परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी सुधारित तारखा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:55 PM2020-11-28T18:55:46+5:302020-11-28T18:56:03+5:30
विद्यापीठ : संकेतस्थळावर लिंक उपलब्ध
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व विद्यापीठ प्रशाळांच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
संलग्नीत महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्थेततील बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी., बी.व्होक (सर्व) बी.ए.-एम.सी.जे., बी.एस.डब्ल्यु., एम.एस. डब्ल्यु., तसेच विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळा/विभागात शिकविल्या जाणाऱ्या बी.एसस्सी. (अक्च्युरल सायन्स), एम.ए., एम.एस्सी., एम.सी.ए., एम.बी.ए., एम.सी.जे., एम.एस.डब्ल्यु., बी.टेक., एम.टेक. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्यासाठीची अंतिम तारीख आता १ डिसेंबर तर विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची तारीख ३ डिसेंबर अशी राहिल. महाविद्यालयांनी परीक्षा अर्ज ऑनलाईन पध्दतीने २ डिसेंबरपर्यंत इनवर्ड करावे लागेल. महाविद्यालयांनी हे परीक्षा अर्ज विद्यापीठ कार्यालयात ४ डिसेंबर पर्यंत सादर करावे लागणार आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज व ऑनलाईन शुल्क भरणेसाठी Digital University Portal [http://nmuj.digitalunkversity.ac] वर उपलब्ध असलेल्या Online Examination Form Submission या सुविधेद्वारे वापर करावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.