पारोळा येथे आढावा बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार न केल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 07:40 PM2020-01-08T19:40:44+5:302020-01-08T19:41:09+5:30
पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व अधिकाºयांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही. परिणामी सभापती रेखाबाई भिल व उपसभापती अशोक पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
पारोळा, जि.जळगाव : येथील पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती रेखाबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची आढावा व मासिक बैठक झाली. नवनिर्वाचित सभापतींच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक होती. यात या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत-सत्कार होणे अपेक्षित होते. पण प्रशासन व अधिकाºयांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही. परिणामी सभापती रेखाबाई भिल व उपसभापती अशोक पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
८ रोजी दुपारी १ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या वेळी त्या त्या अधिकारी वर्गाने आपापल्या विभागाचा आढावा सादर केला. मंजूर कामे, बंद पडलेली कामे, सुरू असलेली कामे आणि पूर्ण झालेली कामे, ही माहिती दिली
शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी १४ ग्रेडेडे मुख्याध्यापक, २३ पदवीधर, १० शिक्षक, २ केंद्रप्रमुख, १ विस्तार अधिकारी अशी ३९ रिक्त पदे असल्याची माहिती दिली, तर शालेय पोषण आहार योजनेच्या अधीक्षक प्रीती पवार यांनी तालुक्यातील पोषण आहार योजनेची माहिती या वेळी दिली
तर कृषी अधिकारी यांनी तालुक्यात ५२ हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यावरील १०० टक्के पंचनामे झाली आहेत व तसा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आल्याचे सांगितले.
एका बाजूला बसेससाठी विद्यार्थी महामार्गावर रास्ता रोको करतात. पण एस.टी. महामंडळाचे अधिकारी म्हणून आलेले कर्मचारी मात्र बसेस वेळेवर सोडण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देतात. यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केले गेले.
या वेळी पशुसंवर्धन, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, बांधकाम, समाजकल्याण, शालेय पोषण आहार, स्वछ भारत अभियान, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय एरंडोल, वीज वितरण कंपनी, सामाजिक वाणीकरण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, उपविभागीय जलसंधारण विभाग, पाणीटंचाई आढावा, लघु पाटबंधारे विभाग या विभागाचा आढावा त्या-त्या विभागप्रमुखाने या वेळी सादर केला.
बैठकीस सदस्य ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, सुजाता बाळासाहेब पाटील, सुनंदा पांडुरंग पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे, सहायक ए.बी.अहिरे आदी उपस्थित होते.
गैरहजर सदस्य
या बैठकीला प्रमोद जाधव, सदस्या छाया पाटील, छाया राजेंद्र पाटील हे तीन सदस्य गैरहजर होते.