ज्ञानशाळेचा वार्षिक उत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:33 AM2021-09-02T04:33:57+5:302021-09-02T04:33:57+5:30

अणुव्रत भवनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र आणि अर्हं वंदनेने झाली. सभाध्यक्ष माणकचंद बैद, महिला मंडळ अध्यक्षा ...

The annual celebration of Jnanshala is in full swing | ज्ञानशाळेचा वार्षिक उत्सव उत्साहात

ज्ञानशाळेचा वार्षिक उत्सव उत्साहात

Next

अणुव्रत भवनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र आणि अर्हं वंदनेने झाली. सभाध्यक्ष माणकचंद बैद, महिला मंडळ अध्यक्षा नम्रता सेठिया, ज्ञानशाळेच्या खान्देश क्षेत्रीय संयोजिका उमा सांखला, ज्ञानशाळेच्या पूर्व संयोजिका रश्मी लुंकड, विनीता समदरिया यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानशाळेत नि:स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या प्रशिक्षिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

चिमुकल्यांनी जिंकली मने

ज्ञानशाळा दिनानिमित्त चिमुकल्यांनी विविध कला सादर केल्या. यामध्ये सानवी छाजेड, दीक्षा मालू, प्रेक्षा मालू, सलोनी सेठिया, आरव सेठिया, शौर्य छाजेड, आरवी चोरडिया, उत्कर्ष बैद, ऋषिका मालू, अर्हम सांखला, उन्नती कुचेरिया, दर्शन कुचेरिया, पार्थ चोरडिया, तन्मय बैद, भव्य छाजेड, पहल छाजेड, सुहानी छाजेड, वीर छाजेड, दिशा गेलडा, हर्षित चोरडिया, जीत दुगड, जनक छाजेड, मुदीत बैद, कृष्णा पुनिया, हर्षिका पुनिया, दिशा चोरडिया, नव्या लोढा आदींचा समावेश होता.

नोरतमल चोरडिया, नीरज समदरिया, प्रशिक्षिक रोनक चोरडिया, सुषमा चोरडिया, मैनादेवी छाजेड, पूर्व महक दुगड, आदित्य समदडिया यांनी सहकार्य केले. तेरापंथ युवक परिषदेचे अध्यक्ष रितेश छाजेड, महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा निर्मला छाजेड, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सह संयोजिका मोनिका छाजेड, प्रशिक्षिका रितू छाजेड यांनी केले तर दक्षता सांखला यांनी आभार मानले.

Web Title: The annual celebration of Jnanshala is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.