जळगावात ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक परिषद; २७ रोजी उद्घाटन

By सुनील पाटील | Published: October 25, 2023 06:20 PM2023-10-25T18:20:05+5:302023-10-25T18:21:42+5:30

राज्यातील ५०० तज्ज्ञ येणार

Annual Conference by Orthopedics Association at Jalgaon; Opening on 27 in jalgaon | जळगावात ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक परिषद; २७ रोजी उद्घाटन

जळगावात ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे वार्षिक परिषद; २७ रोजी उद्घाटन

जळगाव: महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशनतर्फे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवसीय ३९ व्या राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधीतीर्थ येथे २७ रोजी दुपारी चार वाजता डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद‌्घाटन होणार आहे. ३२ वर्षानंतर प्रथमच जळगावला यजमानपदाची संधी मिळाली आहे. यात राज्यभरातून ५०० तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती परिषदेचे आयोजन समितीचे चेअरमन डॉ. सुनील नाहाटा यांनी बुधवारी पत्रकार परिषद दिली.

उद‌्घाटन सोहळ्याला असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉ. नारायण करणे, डॉ. सुनील नाहाटा, डॉ. हर्षवर्धन जावळे यांची प्रमुख उपस्थितीती लाभणार आहे. परिषदेसाठी स्व. डॉ.अनिल आचार्य, डॉ. प्रताप जाधव, डॉ.घनश्याम कोचुरे यांचे नाव तीन सभागृहांना देण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी सकाळी ९ ते दुपारी ५ वाजेपर्यंत सीएमई आणि पीजीकॉनचे आयोजन करण्यात आले आहे. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आणि २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चर्चासत्र, व्याख्याने, पेपर प्रेझेंटेशन, वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. महिला अस्थिरोग तज्ञांसाठी स्वतंत्रपणे एका सत्राचे आयोजन केले असून त्याचे संचालन देखील महिला अस्थिरोग तज्ञ करणार आहेत रविवार २९ रोजी परिषदेचा समारोप होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. ज्ञानेश पाटील, डॉ. निरंजन चव्हाण, डॉ.संजय पाटील, डॉ.नितीन धांडे, डॉ.अनुप पाटील, डॉ हर्षिता नाहाटा, डॉ.दीपक अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते आदी अस्थिरोग तज्ञांची उपस्थिती होती.

Web Title: Annual Conference by Orthopedics Association at Jalgaon; Opening on 27 in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव