जळगाव जिल्ह्यात आणखी 13 कोरोना बाधित रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 06:03 PM2020-05-24T18:03:31+5:302020-05-24T18:03:48+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 झाली* जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव , एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील ...
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 झाली*
जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 17 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर *तेरा* व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ शहरातील 5, अमळनेर येथील 2, जळगाव येथील 3, तर तळवेल, ता. भुसावळ, एरंडोल व भडगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 441 इतकी झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.